Coronavirus : WHO नं जगाला दिला फक्त एकच ‘संदेश’, वाचा काय सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसला महामारी घोषित केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील या भयंकर संकटापासून वाचण्यासाठी म्हटले आहे की, सर्व देशांनी आपल्या येथे संशयित रूग्णांच्या टेस्ट करण्यावर जोर द्यावा. याबाबत डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल यांनी म्हटले की, आम्ही जगातील सर्व देशांना बस एकच संदेश देत आहोत आणि तो म्हणजे टेस्ट, टेस्ट, टेस्ट. सर्व देशांनी प्रत्येक संशयित रूग्णाची टेस्ट करावी. केवळ असे करूनच ही महामारी थांबवणे शक्य आहे.

दरम्यान, यूएसच्या संशोधकांनी सोमवारी प्रथमच एक व्यक्तीला कोरोना व्हायरसचे वॅक्सीन दिले आहे. हे वॅक्सीन प्रयोगिक पद्धतीने दिले आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वॅक्सीनचे परीक्षण करण्यासाठी अनेक महिने लागतील. मीडिया रिपोर्टनुसार 45 लोकांवर सिएटलच्या कँसर परमनन्ट रिसर्च केंद्रात परीक्षण करण्यात येईल. वॅक्सीनमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका नाही. यामध्ये व्हायरसमधून कॉपी केलेले हानीकारक जेनेटिक कोड असतात.

जगभरातील शास्त्रज्ञ सुद्धा वेगाने हे काम करत आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने या पाहिल्या मानवी परीक्षणासाठी निधी दिला आहे. हे काम करणार्‍या बायोटेक्नोलॉजी कंपनी मॉडर्न थेरेप्यूटिक्सचे म्हणणे आहे की, हे वॅक्सीन परीक्षण प्रक्रियेद्वारे बनवण्यात आले आहे.

ब्रिटनच्या इम्पीरियल कॉलेज लंडनमधील संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ जॉन ट्रेगोनिंग यांनी म्हटले की, या वॅक्सीनमध्ये पहिल्यापासून असलेल्याच तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

ते म्हणाले, ही लस खुपच चांगल्या पद्धतीने बनवण्यात आली आहे. यामध्ये त्या वस्तूंचा वापर केला गेला आहे, ज्यास आपण लोकांवरील उपचारासाठी सुरक्षित समजतो. परीक्षणात सहभागी लोकांवर खुपच काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाणार आहे.