Covid-19 : ‘कोरोना’च्या गंभीर रुग्णांचा जीव वाचवू शकतं स्टेरॉईड, WHO नं जाहीर केली नवीन मार्गदर्शक तत्वे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सहजपणे उपलब्ध होऊ शकणारं स्टेरॉईड कोरोना संक्रमित रुग्णांचा जीव वाचवू शकतं? आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या एका क्लिनिकल ट्रायल मध्ये ही माहिती समोर आली आहे. सहजपणे उपलब्ध होऊ शकणारे स्टेरॉईड औषधं कोरोना विषाणूमूळं गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करतात. पुराव्यासह जागतिक आरोग्य संघटनेने या सूचना लागू केल्या आहेत. कोरोना संक्रमाणाने गंभीर असणाऱ्या रुग्णांसाठी याचा वापर करता येईल.

JAMA चे संपादक डॉ हावर्ड सी बाउचर म्हणाले, कोरोना संक्रमणाने मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी स्टेरॉईड खूप उपयोगी ठरणार आहे. आत्तापर्यन्त गंभीर असणाऱ्या रुग्णांसाठी रेमडीसीवर या औषधाचा वापर केला जात होता.

WHO ने सांगितलं की, स्टेरॉईडचे 1700 रुग्णांवर सात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रायल घेण्यात आले. ट्रायल मध्ये माहिती समोर आली की स्टेरॉईडमूळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. डेक्सामेथासोन, हायड्रोकार्टीसोन आणि मिथाइलप्रेडीसोलोन सारख्या स्टिरॉइडचा वापर डॉक्टरांनी कोरोना रुग्णांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, सूज कमी होण्यासाठी करतात.

या शोधातून असे समजते की, स्टेरॉईड कोरोना विषाणूमूळं गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करतं. इंपिरियल कॉलेज लंडनच्या एनेस्थेसिया आणि क्रिटिकल केअरचे अध्यक्ष प्रोफेसर गार्डन म्हणाले, ‘वर्षाच्या सुरुवातीला अनेकदा ही गोष्ट चिंताजनक वाटत होती, कारण आपल्याकडं कोणतंही औषध यावर उपलब्ध नव्हतं. पण तरीसुद्धा सहा महिन्याच्या आत आम्ही उच्च गुणवत्ता असणारे अनेक परिक्षणं यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.’