70 % लसीकरण झाले तरच कोरोना संपुष्टात येईल; WHO चा इशारा

जिनेव्हा : वृत्तसंस्था – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची महासाथ इतक्या संपुष्टात येणार नसल्याचा इशारा डब्लूएचओ ( WHO ) ने दिला आहे. डब्लूएचओ ( WHO ) चे युरोप संचालक हान्स कुल्गे यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. भारतासह संपूर्ण जगात आतापर्यंत 16 कोटीहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत 35 लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण गेले आहेत. लोकसंख्येच्या 70 टक्के लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोरोना संपुष्टात येणार नसल्याचे स्पष्ट मत कुल्गे यांनी व्यक्त केले आहे. तसेच कोरोना लसीकरणाच्या संथ वेगाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वेगाने संसर्ग फैलावणाऱ्या वेरिएंटमुळे चिंता वाढल्याचे कुल्गे यांनी म्हटले आहे. भारतात आढळलेला B.1617 हा वेरिएंट ब्रिटनमध्ये आढळलेल्या B.117 पेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे. कोरोनाच्या संसर्गाला WHO ने जाहीर केल्यानंतरही अनेक देशांनी आपला मौल्यवान वेळ वाया घालवल्याची खंत कुल्गे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी वेगाने लसीकरणाची गरज आहे. जगभरात दररोज आढळणाऱ्या बाधितांच्या संख्येत 13 टक्क्यांनी घट झाली आहे. जगभरात आतापर्यंत 16 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित आणि मृतांची संख्या नोंदवली आहे. दरम्यान कडक लॉकडाऊन आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत ब्रिटनने दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले होते. मात्र शुक्रवारी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या 4 हजार 182 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 2 महिन्यांमध्ये ब्रिटनमध्ये एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन हटवण्याची योजना अधांतरी लटकली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 44 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 1 लाख 27 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात वाढलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका दिसू लागला आहे.

 

Also Read This : 

 

 

नॉनवेजचे ‘शौकीन’ असणार्‍यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ प्रकारचं मांस खात असाल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा व्हाल मानसिक रोगाचे शिकार

 

दुर्दैवी ! अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनाने निधन

 

संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या

 

Pension Scheme : कोरोनाने जीव गमावणार्‍या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मिळणार ‘पेन्शन’, मोदी सरकारकडून अनेक सुविधांची घोषणा

 

 

हृतिक रोशनचा फिटनेस मंत्र: ‘वॉर’ चित्रपटातील कबीर कसा फिट राहतो ते येथे पहा