WHO Europe Office | COVID मुळे यूरोपात होऊ शकतात आणखी 7 लाख मृत्यू, WHO ने हिवाळ्यासाठी दिला गंभीर इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WHO Europe Office | जागतिक आरोग्य संघटनेच्या यूरोप कार्यालयाने (World Health Organization Europe office) कोरोना व्हायरस (COVID-19) च्या सध्याच्या स्थितीवर एक मोठा अपडेट दिला आहे. कोपनहेगनमधील WHO च्या यूरोप कार्यालयाने (WHO Europe Office) ने म्हटले की, थंडीनंतर वसंतापर्यंत 7 लाख आणखी मृत्यू होऊ शकतात. डब्ल्यूएचओ यूरोपने हा अंदाज 53 देशांबाबत व्यक्त केला आहे.
यांना आहे बूस्टर डोसची गरज
तर डब्ल्यूएचओ यूरोपने हे सुद्धा म्हटले की, आता लोक कोरोना संसर्गाबाबत काळजी घेत नाहीत. आता अतिसंवेदशील लोकांना बूस्टर डोस देण्याची गरज आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर आहे त्यांना व्हॅक्सीनचा बूस्टर डोस देण्याची आवश्यकता आहे. या शिवाय 60 वर्षावरील लोकांना बूस्टर डोस दिला पाहिजे. (WHO Europe Office)
बूस्टर डोसवर प्रतिबंध लावा
जिनिव्हातील जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयाने बूस्टर डोसवर विरूद्ध वक्तव्य केले आहे. डब्ल्यूएचओने यावर्षाच्या अखेरपर्यंत बूस्टर डोसवर प्रतिबंध लावण्याबाबत म्हटले आहे.
विकसनशील देशांत व्हॅक्सीनची कमतरता
कारण जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, विकसनशील देशांमध्ये सुद्धा व्हॅक्सीन देणे आवश्यक आहे, या विकसनशील देशांमध्ये अजूनही व्हॅक्सीनची कमतरता आहे. श्रीमंत देशांच्या तुलनेत या देशांमध्ये व्हॅक्सीनची कमतरता आहे.
–
थंडीत चिंता आणखी वाढेल
WHO Europe, Regional Director Dr. Kluge यांनी म्हटले की, यूरोप आणि मध्य आशियामध्ये सध्या कोरोनाची स्थिती खुपच चिंताजनक आहे. थंडीच्या हंगामात चिंता आणखी वाढेल. युरोपमध्ये मागील एक आठवड्यात दररोज 4200 मृत्यू झाले आहेत. संपूर्ण यूरोपमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 15 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.
का वाढत आहेत कोरोनाची प्रकरणे
यूरोपमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, याची तीन प्रमुख कारणे आहेत. यूरोपमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे व्हायरस वेगाने पसरला. मास्क घालणे आणि शारीरीक अंतर सारख्या नियमांचे पालक करण्यात आले नाही.
20 लाख मृत्यू होऊ शकतात
जागतिक आरोग्य संघटनेने (यूरोप) तिसरे कारण सांगितले आहे की अजूनही लोकांनी व्हॅक्सीनेशन केलेले नाही.
यासाठी 25 देशांमध्ये बेड, आणि 53 पैकी 49 देशांमध्ये आयसीयू बेडची गरज आतापासून 1 मार्च 2022 च्या दरम्यान भासणार आहे.
1 मार्च 2022 पर्यंत एकुण 20 लाख मृत्यू कोरोनामुळे होऊ शकतात. (WHO Europe Office)
Web Title :- WHO Europe Office | world health organization europe warns possible surge in covid deaths coronavirus cases
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 929 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी