WHO तज्ज्ञांनी भारतातील ‘कोरोना’च्या स्थितीबाबत केलं महत्वाचं आणि सूचक वक्तव्य

संयुक्तराष्ट्र – जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) च्या प्रमुख तज्ज्ञांनी म्हटले आहे की, भारतात कोरोना व्हायरस महामारीबाबत स्थिती आता स्फोटक नाही, परंतु देशात मार्चमध्ये लागू लॉकडाऊन हटवण्याकडे वाटचाल सुरू केल्याने अशाप्रकारची जोखीम वाढली आहे. डब्ल्यूएचओचे आरोग्य आपत्ती स्थिती कार्यक्रमाचे कार्यकरी संचालक मिशेल रियान यांनी शुक्रवारी म्हटले की, भारता कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी या स्तरावर सुमारे तीन आठवडे आहे.

रियान म्हणाले, भारताच्या विविध भागात महामारीचा परिणाम वेगवेगळा आहे. शहरी आणि ग्रामीण भागात यामध्ये अंतर आहे. दक्षिण आशियात केवळ भारत नव्हे, तर बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये, जास्त लोकसंख्या असणार्‍या दुसर्‍या देशांमध्ये महामारीचे रूप स्फोटक झालेले नाही. परंतु, असे होण्याचा धोका कायम आहे.

रियान म्हणाले, की, जेव्हा महामारी वाढते आणि समाजामध्ये खोलवर रूजते तेव्हा ती कोणत्याही वेळी आपला प्रकोप दाखवू शकते. जसे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. भारतात देशव्यापी लॉकडाऊन सारखी पावले उचलल्याने संसर्ग पसरण्याचा वेग कमी झाला आहे, परंतु देशात व्यवहार पुन्हा सुरू होत असल्याने प्रकरणे वाढण्याचा धोका वाढला आहे.

रियान म्हणाले, भारतात उचलण्यात आलेल्या पावलांमुळे संसर्ग पसरण्याच्या वेगावर निश्चित परिणाम झाला आणि अन्य मोठ्या देशांप्रमाणे भारतात सुद्धा हालचाली, लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाल्याने महामारीचा प्रकोप दिसण्याची जोखीम कायम राहणार आहे.

ते म्हणाले की, भारतात मोठ्याप्रमाणात मजूरांचे स्थलांतर, शहरातील दाटवस्ती, तसेच मजूरांना कामावर जाण्याशिवाय पर्याय नसने, आदी मुद्दे सुद्धा आहेत. भारत कोविड-19 महामारीच्या प्रकरणांमध्ये इटलीला मागे सोडून जगातील सहावा वाईट पद्धतीने प्रभावित झालेला देश बनला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार शनिवारी देशात संसर्गाची एका दिवसात सर्वाधिक प्रकरणे समोर आली, ज्यांची संख्या 9,887 होती, तर 294 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर देशात आतापर्यंत संसर्गाच्या एकुण प्रकरणांची संख्या 2,36,657 झाली आहे. मृतांचा एकुण आकडा 6,642 वर पोहचला आहे.

डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले की, 130 करोडपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना व्हायरसची दोन लाखपेक्षा जास्त प्रकरणे जास्त वाटतात, पण इतक्या मोठ्या देशासाठी ही संख्या अजूनही खुप जास्त नाही.

त्या म्हणाल्या, भारत एक विशाल देश आहे, जेथे खुप मोठ्या लोकसख्येची शहरे आहेत, तर काही ग्रामीण भागात कमी दाट वस्ती आहे आणि याशिवाय विविध राज्यांमध्ये आरोग्य प्रणालीमध्ये सुद्धा विविधता आहे, या सर्व बाबींमुळे कोविड-19 ला नियंत्रित करण्यात आव्हाने समोर येत आहेत. स्वामीनाथन यांनी म्हटले लॉकडाऊन आणि प्रतिबंध उठवण्यासोबतच ठरवले पाहिजे की, लोकांनी सर्वप्रकारची खबरदारी घेतील.

त्या म्हणाल्या, आम्ही हे वारंवार सांगत आहोत की, जर तुम्हाला मोठ्या स्तरावर बदल हवा असेल तर लोकांना या गोष्टीचे महत्व समजले पाहिजे की, सतत त्यांना मास्क घालण्यासारख्या गोष्टी सतत का सांगितल्या जात आहेत.