मोठी बातमी ! WHO चा नवा दावा, म्हणाले – ‘कोरोना संसर्ग वुहानमधून नाही’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग चीनच्या वुहानमधून झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 4 शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून नवा दावा केला आहे. त्यानुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग चीनच्या वुहान शहरातून झाला नसल्याचे सांगितले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत वुहानमध्ये पुरावेही आढळून आलेले नाहीत.

कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात पसरू लागला होता. तेव्हापासूनच चीनमधील वुहान शहर जगाच्या नजरेत आले. याच शहरातून कोरोनाचा उद्रेक झाल्याचे सांगण्यात येत होते. तसेच चीननेच कोरोना व्हायरसची निर्मिती केल्याचे अनेक पुरावेदेखील काही देशांनी दिले होते. मात्र, आता याबाबत WHO कडून नवी माहिती दिली जात आहे. कोरोना व्हायरसची निर्मिती आणि त्याच्या प्रसाराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी WHO चे पथक वुहान शहरात तपासणीसाठी गेले होते. त्यानंतर WHO ने सांगितले, की चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्याबाबतचे पुरावेही आढळून आलेले नाहीत.

कोरोनाचा संसर्ग झालेली वटवाघुळे

WHO च्या पथकातील सदस्य डॉ. पीटर दजाक यांनी सांगितले, की दक्षिण चीनच्या क्षेत्रातून वुहानमध्ये आलेली पाइपलाइन होती. याच भागातून कोरोनाचा संसर्ग झालेली वटवाघुळे आली होती. शेतीशी निगडित आणि पाळीव जनावरांपासून व्हायरस वाढला आहे. वन्यजीव व्यापारामुळे वुहान येथे पोहोचला.

वन्यजीवांचा व्यापार महत्त्वाचं कारण

वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे सांगतानाच WHO ने म्हटले, की कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसार याचे मुख्य कारण म्हणजे वन्यजीवांचा व्यापार हे आहे, असा दावा केला आहे.