KBC 12 : हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?, भाजपाचा सवाल

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायास यामुळे बिग बी चांगलेंच अडचणीत सापडले आहेत. मंगळवारी भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी आक्षेप नोंदवत, सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर “हिंदूंच्या पूजनीय धर्मग्रंथांविषयी असा अपमानजनक उल्लेख करण्याचे स्वातंत्र्य या वाहिनीला व अमिताभ बच्चन यांना कोणी दिले ?” असा प्रश्न भाजपने विचारत आपली भूमिका स्पष्ट केली.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात २५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या? असा प्रश्न विचारला गेला होता. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. अशा कृतीतून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसंच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न लपून राहत नाही”. असं अभिमन्यू पवार म्हणाले होते.

भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्हीवरच्या प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायाना आक्षेप घेतला आहे. भाजपा विरोधकांनी व माध्यमांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार मूळ आक्षेपाला बाजूला ठेऊन सोयीस्कर नवा वाद उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच, अभिमन्यू पवार यांनी मनुस्मृती विषयी प्रश्न विचारला म्हणून आक्षेप घेतला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मग्रंथाचे दहन केले होते? हा प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तराच्या चार पर्यायांपैकी तीन पर्याय हिंदू धर्मीयांसाठी श्रेष्ठ आणि पूजनीय असलेल्या भगवद्गीता, विष्णुपुराण व ऋग्वेद हे देण्यात आले. मानवी जीवनमूल्ये शिकवणारे व आज संपूर्ण जग ज्या मानव कल्याणाच्या विचाराने प्रेरित होते आहे, ते धर्म ग्रंथ डॉ. आंबेडकर असे काय जाळतील ? डॉ. आंबेडकरांचा संदर्भ देऊन हिंदूंच्या पूजनीय धर्मग्रंथांविषयी असा अपमानजनक उल्लेख करण्याचे स्वातंत्र्य या वाहिनीला व अमिताभ बच्चन यांना कोणी दिले ?” असा प्रश्न देखील
भाजपनेउपस्थित केला आहे.