WHO Guidelines : फॅब्रिक्स की मेडिकल मास्क? कोणासाठी, कोणता मास्क योग्य; WHO ने दिला सल्ला (Video)

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या लढ्यात मास्कचा वापर शस्त्रासारखा केला जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क हे एक महत्त्वपूर्ण सावधगिरीचे उपाय आहेत. दररोज संसर्गाचा आलेख वाढताना आरोग्य तज्ञ सुरक्षा, मास्क यांच्यासह इतर उपाययोजनांमध्ये निष्काळजीपणा न करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान WHO ने जारी केलेल्या पोस्टमध्ये मास्क कसे घालायचे हे स्पष्ट केले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये WHO ने फॅब्रिक्स मास्क आणि मेडिकल मास्क असे दोन प्रकारचे मास्क घालण्याचा आणि ते कोणी वापरावेत याचा सल्ला दिला आहे.

WHO ने सूचित केले आहे की, आरोग्य कर्मचारी, ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आहेत. तसेच कोरोना रुग्णांची काळजी घेणारे लोक, ज्या ठिकाणी विषाणूचा व्यापक प्रसार झाला आहे, अशा ठिकाणी मेडिकल मास्कचा वापर करावा. जे लोक 60 किंवा त्यापेक्षा वयाने मोठे आहेत तसेच ज्यांना इतर कोणतेही आजार असतील त्यांनी या प्रकारचे मास्क वापरायला हवा.

मेडिकल मास्क एकदाच वापरायला चालतात. वापर झाल्यानंतर दररोज कचर्‍यामध्ये टाकणे गरजेचे आहे. WHO ने सूचित केले आहे की, कोरोनाची लक्षणे नसलेल्या लोकांना फॅब्रिक मास्क घालता येतात. यात सोशल वर्करर्स, कॅशिअर, यांच्याशी जवळीक साधणा-या लोकांचा देखील समावेश होतो. वाहतूक, कामाची ठिकाणे, किराणा दुकान आणि इतर गर्दी असलेल्या वातावरणात सार्वजनिक ठिकाणी फॅब्रिक मुखवटे घालावेत. फॅब्रिक मास्क प्रत्येक उपयोगानंतर कोमट पाण्याने धुणे आवश्यक असल्याचे WHO ने म्हटले आहे.