कोण आहे 6 वर्षांची माहिरा इरफान, जिच्या आवाहनावर राज्यपालांनी कमी केली ऑनलाइन क्लासेची वेळ

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था होमवर्कने त्रस्त झालेल्या काश्मीरी मुलीने सोशल मीडियावर पीएम मोदींना (PM Modi) विनंती केली. मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल झाला. व्हिडिओमध्ये मुलगी, तक्रारीच्या सूरात म्हणत आहे की, छोट्या-छोट्या मुलांकडून इतका होमवर्क का करू घेतात. जम्मू काश्मीरच्या या मुलीचा व्हिडिओ चर्चेत आला तेव्हा उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मुलीच्या तक्रारीची दखल घेतली. यानंतर आजतक या वृत्तवाहिनीची टीम सुद्धा, सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या मुलीला भेटण्यासाठी श्रीनगरमध्ये पोहचली.

श्रीनगरच्या बटमालूमध्ये राहणारी 6 वर्षांची मुलगी माहिरा इरफान, आपल्या वायरल व्हिडिओत म्हणते की, आमचा ऑनलाइन क्लास 10 वाजता सुरू होतो आणि दोन वाजेपर्यंत चालतो. ज्यामध्ये इंग्लिश, मॅथ्स, उर्दू आणि ईव्हीएस शिकावे लागते. मोदी PM Modi साहेब मुलांना अखेर इतके काम करावे लागते?

माहिराने चर्चेत सांगितले की, तिला माहित आहे देशाचे पीएम कोण आहेत, यासाठी तिने आपल्या व्हिडिओत पीएम मोदींचे PM Modi नाव घेतले. मायराच्या या तक्रारीला सोशल मीडियावर समर्थन मिळताना दिसले. काही आई-वडीलांचे म्हणणे आहे की, इतक्या छोट्या मुलांना ऑनलाइन क्लासेसमध्ये इतके काम मिळते की, मुले हैराण होऊ लागतात.

तर माहिराचा तक्रारीचा व्हिडिओ इतका शेअर झाला की, जम्मू काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनी व्हिडिओ वायरल झाल्यानंतर शाळकरी मुलांवर दबाव कमी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये एक धोरणात्मक बदलाची सुरूवात केली आहे.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मंगळवारी ट्विट करत लिहिले, शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी रोज होणार्‍या ऑनलाइन क्लासेसचा कालावधी दिडतास करण्याचे ठरवले आहे. हे दोन सत्रात होईल. तर नववी ते बारावी वर्गासाठी तीन तासापेक्षा जास्त सत्र नसेल.

यापूर्वी मनोज सिन्हा यांनी मुलीचा व्हिडिओ शेयर करत ट्विट केले होते की, खुपच प्रेमळ तक्रार. शाळकरी मुलांवर होमवर्कचा भार कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 48 तासांच्या आत धोरण बनवण्याचे निर्देश दिले आहेत, बालपणातील निष्पापता देवाची भेट आहे आणि त्यांचे दिवस जीवंत, आनंद आणि आनंदाने भरलेले पाहिजे.

Also Read This : 

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या