BOlD अँड ब्युटीफुल ‘अप्सरा रानी’ आहे तर कोण ? लवकरच राम गोपाल वर्मांच्या आगामी सिनेमात झळकणार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री अप्सरा रानी सध्या सोशलवर आपल्या बोल्ड अवतारामुळं जोरदार चर्चेत आहे. सोशलवर ती ट्रेंड करत आहे. अनेकांना अप्सराबद्दल माहित नाही. सध्या अप्सरा बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. राम गोपाल वर्मा यांनी तिला लाँच केला आहे. आगामी थ्रिलर या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राम गोपाल वर्मा यांनी थ्रिलर सिनेमाच्या सेटवरील फोटोशुटमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. सोशलवरून अप्सराचे फोटो शेअर कर राम गोपल वर्मा तिला प्रमोट करत आहे.

अप्सरा प्रॉपर ओडिशाची आहे. सध्या हैद्राबादला रहात आहे. अलीकडेच राम गोपाल वर्मा आणि अप्सरा यांनी अनेक ट्विट्स केले आहेत.

राम गोपाल वर्मानं लिहिलं की, “RGVWORLDTHEATRE मध्ये आमच्या आगामी सिनेमाची हिरोईन अप्सरा रानी. या सिनेमाचं नाव थ्रिलर आहे. CLIMAX and NAKED च्या सुपर सक्सेनंतरचा हा फॉलोअप आहे.”

अलीकडेच राम गोपाल वर्मांनी ट्विट करत असंही म्हटलं होतं की, ओडिशातही एवढं टॅलेंट असेल असं वाटलं नव्हतं. अप्सरा एक उत्तम डान्सर आणि अॅक्टर आहे.

अप्सराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती राम गोपाल वर्मांच्या थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. तिनं ओडिशा आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. अप्सराचं खरं नाव अंकिता महाराणा (Anketa Maharana) आहे. राम गोपाल वर्मांनी बदलून हे नाव अप्सरा ठेवलं आहे.

https://twitter.com/apsara_rani_/status/1280221126229024770?s=20

https://twitter.com/apsara_rani_/status/1279741538256338944?s=20