धोनी की कोहली : कोण आहे वरचढ ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – आज पासून आयपीएलच्या १२ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना चेन्‍नई सुपरकिंग्‍स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू मध्ये होणार आहे. म्हणजे भारतीय संघाचे मोठे खेळाडूंचे प्रतिनिधीत्व एकत्र पाहायला मिळणार आहे. विराट कोहली विरुद्ध महेंद्रसिंह धोनी यांच्यात सामाना असणार आहे.

दोन्ही संघातील फलंदाजांची फळी भक्कम आहे. त्यामुळे हा सामना फलंदाजांच्या फलंदाजीनेच रंगण्याची शक्यता आहे. कोहलीने आतापर्यंत चेन्नई संघांच्या विरोधात ७३२ धावा केल्या आहेत. ज्या आयपीएलमधील कोणत्याही संघाच्या विरोधात केलेल्या विक्रमी धावा आहेत. विराटने चेन्नईच्या विरोधात १२ सामन्यात ३० हून अधिक धावा केल्या आहेत. तिथंच महेंद्रसिंह धोनीने बंगळुरुच्या संघाविरोधात ७१० धावा बनवल्या आहेत. ज्या बंगळुरुच्या विरोधात केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

दरम्यान, मागच्या हंगामात कोहलीने चेन्नईच्या विरोधात दोन सामन्यात अनुक्रमे १८ आणि ८ धावा केल्या होत्या. तर धोनीने याच सामन्यात अनुक्रमे ७० आणि ३१ धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यात चेन्नई बंगळुरुवर वरचढ ठरली होती. आता आजच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.