Byju Raveendran : इंजिनियर ते शिक्षक आणि नंतर उद्योगपती बनण्यापर्यंतचा प्रवास, अशी उभी केली इतकी मोठी कंपनी

नवी दिल्ली : ऑनलाइन क्लासच्या क्षेत्रात मोठे यश मिळवलेले बायजू एका गावात शिकलेल्या व्यक्तीने सुरू केले आहे. या व्यक्तीचे नाव बायजू रवींद्रन आहे. BYJU’S ने एक अरब डॉलर (सुमारे 7300 कोटी रुपये) मध्ये आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे. इतकेच नव्हे, बायजूच्या संस्थापकाला फॉर्च्यूनने आकाश अंबानी आणि ईशा अंबानी सोबत स्थान दिले आहे. बायजू रवींद्रन यांच्याबाबत जाणून घेवूयात.

गावात शिक्षण घेऊन इंजिनियर बनले
बायजू रवींद्रन यांची कथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. केरळच्या कन्नूर जिल्ह्याच्या अझिकोड गावात जन्मलेले रवींद्रन यांचे आई-वडील शिक्षक होते आणि त्यांनी आपले शिक्षण मल्याळम भाषेत सुरू केले. यानंतर त्यांनी इंजिनियरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आणि अनेक वर्ष एका शिपिंग कंपनीत काम केले. एकदा सुट्टीत ते घरी आले होते आणि त्यांनी आपल्या मित्रांना कॉमन अप्टीट्यूड टेस्ट (सीएटी) प्रवेश परीक्षेत मदत केली होती, ज्यानंतर त्यांच्या मित्रांना मोठे यश मिळाले. यानंतर रवींद्रन यांचा प्रवास शिक्षक म्हणून सुरू झाला.

बायजूजच्या वर्गांनी लोकप्रियता मिळवली
यानंतर रवींद्रन यांच्या बायजूज क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि केव्हा त्यांनी एक हजार विद्यार्थ्यांचा आकडा ओलांडला त्यांनाच समजले नाही. यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी जास्त झाली की, त्यांना क्लासेस घेण्यासाठी स्टेडियम आणि ऑडिटोरियममध्ये जावे लागत होते.

त्यांच्या क्लासेसची लोकप्रियता वाढत गेली आणि विद्यार्थ्यांमध्ये ते बायजूज क्लासेस नावाने लोकप्रिय झाले. बायजूज क्लासेसचे नाव त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी दिले. 2007 मध्ये रवींद्रन यांच्या बायजूज क्लासेसची लोकप्रियता खुपच वाढली. यानंतर 2011 मध्ये त्यांनी थिंक अँड लर्न नावाची कंपनी बनवली, जिने कॅट सारखी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कंटेट बनवण्याऐवजी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कंटेंट बनवणे सुरू केले. 2011 ते 2015 पर्यंत रवींद्रन यांच्या कंपनीने इयत्ता 6 वी पासून 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ कंटेंट तयार केला आणि जवळपास सर्व विषय कव्हर केले. थिंक अँड लर्न बायजूची पेरेंटल कंपनी आहे.

2015 मध्ये लाँच केले होते बायजू
बायजूज अ‍ॅप 2015 मध्ये लाँच करण्यात आले, जे एक गेम चेंजर प्रॉडक्ट बनले. स्मार्टफोनच्या लोकप्रियतेसह हे अ‍ॅपसुद्धा लोकप्रिय होत गेले आणि त्याने अनेक यशाचे टप्पे गाठले. या दरम्यान बायजू रवींद्रन यांना मागच्या वर्षी वेल्थ मॅगझीन फॉर्च्यूनने आपल्या यादीत सहभागी केले होते, ज्यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी सुद्धा सहभागी होते. 2020 मध्ये फॉर्च्यूनने 40 वर्षापर्यंत वयाच्या जगातील 40 सर्वात प्रभावी लोकांची यादी तयार केली होती, ज्यामध्ये बायजू रवींद्रन यांना सुद्धा सहभागी केले होते. या यादीत रविंद्रन यांना 46वी रँक मिळाली होती आणि त्यांचे नेटवर्थ 3.05 बिलियन डॉलर (जवळपास 22.3 हजार कोटी रुपये) सांगण्यात आले होते.