वेगवेगळ्या टप्प्यात वॅक्सीन देण्यावर विचार करतेय WHO, जाणून घ्या कुणाला पहिल्यांदा मिळणार ?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारी कहर अजूनही जगभर सुरूच आहे आणि जग अतिशय उत्कटतेने याविरोधातील वॅक्सीनची वाट पहात आहे. कोरोना वॅक्सीनचे अनेक देशात अंतिम टप्प्यात परीक्षण सुरू आहे, तर रशियाने वॅक्सीनच्या पहिल्या लॉटचे प्रॉडक्शन सुद्धा सुरू केले आहे. लोकांच्या मनात आता असा प्रश्न येत आहे की, अखेर कुणाला ही वॅक्सीन अगोदर मिळेल?

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनोच्या विरूद्ध सर्व देशांच्या समोर धोका कमी करण्यासाठी प्रस्तावित वॅक्सीनच्या वाटपाचा प्रस्ताव दिला आहे. श्रीमंत राष्ट्रांच्या कानाकोपर्‍यात मर्यादीत पुरवठा पोहचवणे महामारीच्या प्रयत्नांमध्ये अडथळा ठरू शकते.

डब्ल्यूएचओने म्हटले की, कोरोना व्हायरस वॅक्सीनचे वाटप प्रथम सर्व देशांच्या प्रमाणबद्धतेनुसार केले पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या लोकसंख्येबाबत विचार केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात उत्पादनापूर्वी मर्यादित मात्रेत कोरोना वॅक्सीन उपलब्ध राहिल. अशावेळी अनेक देशांनी सुरूवातीला याच्या वाटपासाठी विशेष समिती बनवली आहे.

जून महिन्यात डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरस वॅक्सीनच्या धोरणात्मक वाटपासाठी एक अस्थायी योजना समोर आली होती. यात म्हटले होते की, सर्वप्रथम वॅक्सीन आरोग्य कर्मचारी, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह, लठ्ठपणा किंवा जुना श्वसनासंबंधीचा आजार असलेल्या लोकांना दिली पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेडरोस अधानोम घेब्रेसस यांनी म्हटले की, कोविड-19 स्पॅनिश फ्लूपेक्षा कमी वेळात नष्ट होईल. आम्हाला आशा आहे की, 2 वर्षापेक्षा कमी वेळात कोरोना व्हायरस संपुष्टात येईल. 1918 मध्ये पसरलेल्या महामारीपेक्षा कमी वेळात कोरोना संपेल.

पाच औषध उत्पादक कंपन्या, ज्यापैकी 3 ची क्लिनिकल ट्रायल अजून सुरू आहे, त्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी तीन दिवसांच्या आत कोविड-19 वॅक्सीनसाठी रोडमॅप सांगावा की, त्यांच्या वॅक्सीनला मंजूरी मिळाली तर कशाप्रकारे ते मोठ्याप्रमाणात करणार, त्याची किती किमत ठेवणार. भारताने आतापर्यंत कोणत्याही वॅक्सीन बनवणार्‍या कंपन्यांकडून प्री-प्रोडक्शनची डील करण्यात आलेली नाही, ज्या यशस्वीपणे क्लिनिक ट्रायलनंतर रेसमध्ये आहेत.