‘जन्मठेप’ सुनावण्यात आलेले माजी IPS अधिकारी संजीव भट्ट कोण ? जाणून घ्या सर्व गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातचे आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. खरंतर ते जास्त चर्चेत तेव्हा आले जेव्हा त्यांनी सर्वोच्च्य न्यायालयमध्ये त्यांनी शपथपत्र दाखल केले होते, आणि सर्वोच्च न्यायालयाने ते चूकीचे असल्याचे स्पष्ट केले.

आयआयटी मुंबईमधून पोस्ट ग्रॅजुएट झालेले संजीव भट्ट 1988 मध्ये भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी आयआयटी मुंबईमधून एम टेक केले होते. त्यांनंतर लोकसेवेच्या परिक्षेत पास झाल्यानंतर त्यांना आयपीएस म्हणून गुजरात केडर मिळाले.

Image result for ips sanjiv bhatt election

या कारणामुळे बडतर्फ –

त्यानंतर जवळपास 25 वर्ष त्यांनी गुजरातच्या जिल्ह्यांमध्ये पोलिस आयुक्तालयात आणि इतर पोलिस कार्यालयात काम पाहिले. त्यानंतर 2015 साली गुजरात सरकारने त्यांना बडतर्फ केले. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा पासून ते तुरुंगात आहेत. भट्ट यांना 2011 साली विना परवानगी कामावर अनुपस्थित राहणे आणि सरकारी गाड्यांचा दुरूपयोग केल्याप्रकरणी आरोप लावून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये याच आधारावर त्यांना बडतर्फ करण्यात आले.

भट्ट गुजरातमध्ये 90 च्या दशकात जेव्हा जेव्हा पदावर होते तेव्हा तेव्हा त्यांच्या कामाच्या पद्धतीने ते लोकांमध्ये चर्चोत राहिले. 1990 च्या दशकात ते जामनगर येथे अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून पदावर होते. त्याचवेळी जोधपूरमध्ये दंगली उसळल्या होत्या आणि त्यात पोलिसांनी 100 पेक्षा आधिक लोकांना अटक केली होती.

यात काही असे लोक देखील होते ज्यांनी पोलिसांच्या ताब्यात असताना खूप यातना दिल्याचा आरोप लावला. यात प्रभूदास वैष्णवी, ज्यांना खूप वाईट अवस्थेत पोलिसांनी सुटका केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. याच आरोपाखाली संजीव भट्ट यांना अजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

गुजरातमध्ये अनेक पदांवर केले काम –

संजीव भट्ट हे डिसेंबर 1999 ते सप्टेंबर 2002 पर्यंत राज्याच्या गुप्तचर खात्यात उपायुक्त म्हणून कार्य करत होते. गुजरातमधील दहशतवादाशी संबंधित अनेक प्रकरणे त्यांच्या अधीन होती. यात सीमा सुरक्षा आणि तटीय सुरक्षा याबरोबरच काही विशिष्ट लोकांची सुरक्षेचा समावेश होता. ते नोडल अधिकारी देखील होते, अनेक केंद्रीय संस्थांबरोबर आणि सेनेबरोबर गुप्त माहितींचे आदान प्रदान करत होते.

संजीव भट्ट यांना 2015 साली गुजरात सरकारने नोकरीवरून बडतर्फ केले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीने आरोप केला होता की त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले होती की एका वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना आणि त्यांच्या मुलाला उडवण्याचा प्रयत्न केला.

Related image

मोदींविरोधात लढली होती निवडणूक –

संजीव भट्ट यांच्या पत्नी श्वेता भट यांनी 2012 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढली होती, ही निवडणूक त्यांनी अहमदाबादच्या मणिनगर विधानसभेहून मोदीच्या विरोधात लढली होती. ज्यात त्यांचा पराभव झाला.

मादक पदार्थांच्या प्रकरणात अटक –

1998 साली देखील मादक पदार्थांच्या प्रकरणात भट्ट यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी संजीव भट्ट यांना मादक पदार्थांच्या शेती प्रकरणात 6 अन्य जणांबरोबर अटक करण्यात आली होती. 1998 ला भट्ट बनासकांठाचे डीसीपी होते.

आरोग्यविषयक वृत्त –

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय