२७ युरोपियन संसद सदस्यांना काश्मीर ट्रिप ‘मादी शर्मा’ यांच्यामुळे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर हा भारत पाकिस्तानमधील अंतर्गत प्रश्न आहे, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉर्ड टॅम्प यांना मध्यस्थी करण्यास भारताने नकार दिला होता. असे असताना इंटरनॅशनल ब्रोकरची मदत घेऊन २७ युरोपियन संघाच्या सांसद सदस्याची ट्रिप काश्मीरमध्ये आयोजित करण्याचे प्रायोजन काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

देशातील विरोधकांना काश्मीरमध्ये जाऊ देण्यास बंदी घातली जात असताना त्यांना श्रीनगरच्या विमानतळावरुन परत पाठविले जात असताना युरोपियन संसद सदस्यांना कसे काय काश्मीरमध्ये जाऊन दिले जाते. त्यांचा हा दौरा सरकारी नसेल तर तो आयोजित करणाऱ्या मादी शर्मा कोण आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होईल, हे त्यांच्यातर्फे कसे सांगू शकतात, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. या सर्व प्रकार ब्रिटनचे लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे संसद सदस्य क्रिस डेवीज यांनी या दौऱ्याबाबत झालेल्या ई मेलचा भंडाफोड केल्यानंतर पुढे आला आहे.

Image result for madi sharma

युरोपियन संसद सदस्य सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी काश्मीरातील काही ठिकाणांना भेटी दिल्या असून आजही ते काश्मीरी लोकांशी संवाद साधणार आहेत. हा सर्व खटाटोप करणाऱ्या मादी शर्मा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मादी शर्मा यांची एक एनजीओ आहे.WESTT women’s economic and social Think Tank वेस्ट : वूमन्स इकोनॉमिक्स अँड थिंक टँक या नावाचा त्यांची एनजीओ आहे. या एनजीओमार्फत त्यांनी युरोपियन संसद सदस्यांना ई मेल केले आहेत.

त्यात त्यांनी या खासदारांचा येण्या जाण्याचा व राहण्या, खाण्यापिण्याचा खर्च दुसरी संस्था करणार असल्याचे म्हटले आहे. इंटरनॅनशनल इस्टिट्युट फॉर नॉन अलाइन्स स्टडीज ही संस्था करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या संस्थेचे कार्यालय दिल्लीतील सफदरजंग रोडवर आहे. १९८० मध्ये स्थापन झालेली ही संस्था अलिप्त राष्ट्रातील आंदोलनावर सभा संमेलन आयोजित करते. अलिप्त राष्ट्रातील प्रश्नांबाबत बनलेली ही संस्था युरोपियन संघातील २७ खासदारांचा खर्च का करेल. या संस्थेच्या वेबसाईटवर तिचा अध्यक्ष कोण याचे नाव नाही.

मादी शर्मा युरोपियन इकोनॉमिक अँड सोशल कमिटीची सदस्य आहे. जी युरोपियन युनियनची एक सल्लागार संस्था आहे भारताने काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर त्यावर मादी शर्मा हिने ३७० वर एक लेख लिहिला होता़ त्या अगोदर तिचा काश्मीरशी काही संबंध आला नव्हता़ ३७० रद्द करण्याचा विजय आणि काश्मीरी महिलांसाठी कसोटी आहे का ?, असे तिचा लेखाचे शिर्षक होते. हा लेख युरोपीयन संसदेशी संबंधित एका टुडे मासिकात प्रसिद्ध झाला होता.

यापूर्वी मालदिव मधील सरकार अडचणीत असताना तिने असाच संसद सदस्यांचा दौरा आयोजित केला होता. मादी शर्मा हिचे टिष्ट्वटर अकाऊंट आहे. तिचे ३ हजारापेक्षा कमी फॉलोअर्स आहेत. तिचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा फोटो आहे. तिची स्वतंत्र ओळखही आहे. तिच्या प्रोफाईलनुसार ती म्यानमारमधील रोहिंग्याबाबत चिंतित आहेत. तसेच चीनमधील उघूर मुसलमानांबरोबर होणाऱ्या अन्यायाबाबत चितिंत असून ते चुकीचे मानते. असे विचार हिचे आहेत. निर्वासितांना कोणताही अधिकार देऊ नये, या बाजूची ती आहे. मादी शर्मा स्वत:ला गांधीवादी मानते. तिच्या साईटवर गांधीचे वचनही आहे.
जे युरोपियन खासदार इस्लाम विरोधात असून कट्टर ख्रिश्चन आहेत, अशा खासदारांना तिने बोलावून घेतले आहे. तिला यासाठी कोणी मदत केली.

भारताने हा सरकारी दौरा नसल्याचे अधिकृतपणे जाहीर केले असले तरी मादी शर्मा हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट कशी मिळाली. तिने मोदींच्या वतीने भेटीची तारीख या खासदारांना कशी सांगितली.
अमेरिकन सिनेटरांपासून कोणालाही काश्मीरला जाऊ देण्यास भारताने विरोध केला असताना भारताने आता मादी शर्मा हिची मदत का घेतली? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Visit : Policenama.com