‘न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट न घालणार्‍यावर कारवाई होणारच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतली आहे. १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीला सुरुवात केली आहे. परंतु या हेल्मेट सक्तीला पुण्यामधील काही नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीवरून पोलीस विरुद्ध सामान्य नागरिक असा संघर्ष सुरु झाला आहे. असे असले तरी हेल्मेट संदर्भात पुणे वाहतुक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे दुचाकीचालक हेल्मेट न घालता वाहन चालवतील त्यांच्यावर कारवाई सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेल्मेटसक्ती विरोधात पुणेकरांनी गुरुवारी शहरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. रस्त्यावर उतरून, हातामध्ये फलक घेऊन आपला हेल्मेट सक्तीला असणारा विरोध पुणेकरांनी दर्शवला आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्यांनी केलेल्या सुचनांवर विचार केला जाईल, असे सांगताना हेल्मेट सक्तीविरोधात काढण्यात आलेल्या या रॅलीत सहभागींवरही कारवाई करण्यात आल्याचे डीसीपी सातपुते यांनी सांगितले.

आज पुण्यातील कृती समितीकडून हेल्मेट सक्ती विरोधी  सविनय कायदेभंग दुचाकी निषेध रॅली काढण्यात आली. होती.  पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर ही रॅली नेण्यात आली. यानंतर  हेल्मेट सक्ती होता कामा नये या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना देण्यात आले.

या रॅलीमध्ये कृती समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मनसे नेत्या रूपाली पाटील तसेच विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी या रॅलीत सहभागी झाले होते.

यानंतर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेईल याकडे आता नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.