पत्नी राधिकाच आहे अजिंक्य रहाणेची प्रेरणास्त्रोत ! ‘अशी’य दोघांची Love Story

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) खूप शांत आणि संयमी खेळाडू मानला जातो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत जेव्हा भारतानं 2-1 असा विजय अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मिळवला तेव्हा मायदेशी परतल्यावर अजिंक्यचं जोरदार स्वागत झालं. पत्नी राधिका धोपावकर (Radhika Dhopavkar) आणि मुलीनं त्याचं स्वागत तर केलंच परंतु विमानतळावरून घरी आल्यानंतर मात्र संपूर्ण सोसायटीच अजिंक्यच्या स्वागतासाठी हजर होती. इतकंच नाही तर तुतारी आणि ढोलताशासह त्याचं स्वागत करण्यात आलं. राधिकाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. कारण ती ग्लॅमर वर्ल्ड पासून दूर असते.

अजिंक्य-राधिकाची लव्ह स्टोरी

या दोघांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. दोघं एकाच शाळेत शिकत होते आणि लहानपणापासून एकत्र होते. नंतर या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. जवळच रहायला असल्यानं दोघांची कायमच भेट होत असे. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर घरच्यांनाही याबाबत सांगितलं.

2014 साली झालं होतं लग्न

कुटुंबियांनी परवानगी दिल्यानंतर या दोघांनी 26 डिसेंबर 2014 रोजी लग्न केलं.

लग्नात केली होती ही चूक

लग्नासाठी अजिंक्य राधिकाच्या घरी टीशर्ट आणि जिन्स घालून गेला होता. त्याला असं पाहिल्यानंतर राधिका खूप रागावली होती. नंतर त्याला त्याची चूक लक्षात आली. याबद्दल सांगताना अजिंक्यनं सांगितलं होतं की, त्याला कपडे घालण्यासाठी वेळ मिळाला नव्हता.

सर्वकाही राधिकाच

अंजिक्य त्याची पत्नी राधिकालाच प्रेरणास्त्रोत मानतो. राधिकानं कायम त्याला सपोर्ट केल्याचं तो सांगत असतो. लहानपणापासून मित्र असल्यानं दोघं एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू शकतात.

ग्लॅमर जगापासून दूर आहे राधिका

राधिकाला साधं आयुष्य जगायला खूप आवडतं. हेच कारण आहे की, ती ग्लॅमर जगात दिसत नाही. इतकंच नाही तर राधिका सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय नसते. पार्टी असो किंवा इव्हेंट त्यातही राधिका कमीच दिसते. ती स्वत:ला होममेकर असल्याचं सांगते.