करीना म्हणते बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर ही बॉलिवूडची जोडी नेहमीच चर्चेत असलेली जोडी आहे. सैफ हा किती आदर्श नवरा आहे आहे सांगण्यात करीना गुंग असते . दरम्यान एका चॅटशो मध्ये प्रश्नाला उत्तर देताना करीना कपूर चांगलीच भडकली. करीना कपूरच्या बिकनी फोटोवरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्यावर ‘मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण ? असे उत्तर करिनाने दिले.

अभिनेता अरबाज खानच्या क्विक हिल पिंच या नव्या चॅट शोमध्ये करिना सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये करिनाला तिच्या फोटोंवरील काही कमेन्ट्स वाचून दाखवण्यात आल्या. या कमेन्टसमधून अनेकांनी करिनाला टार्गेट करत तिच्या कपड्यांसंदर्भात टिप्पणी केली होती . यापैकी एका कमेन्टवर करिना चांगलीच संतापली. या कमेन्टमध्ये ‘सैफ तुझी बायको बिकीनी घालते याची तुला लाज वाटत नाही का ?’ असा सवाल केला होता . अरबाजने ही कमेन्ट वाचून दाखवल्यानंतर लगेचच करिनाने यावर आपले मत व्यक्त केले. ‘मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणारा सैफ कोण ? सैफ आणि माझे नाते असे नाही, ज्यामध्ये तो मला कधी तू ही बिकीनी का घालती किंवा तू असं का केलं असा प्रश्न विचारेल. आमचे नाते खूप प्रगल्भ आहे. त्याचा माझ्यावर विश्वास आहे. आणि जर मी बिकीनी घालत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असणार,’ असं मत करिनाने नोंदवलं आहे.

Loading...
You might also like