नवी दिल्ली : वृत्त संस्था – यात्रीगण कृपया ध्यान दें ट्रेन नंबर…हे वाक्य तुम्ही रेल्वे स्थानकात कधीतरी जरूर ऐकल असेल. तुम्हाला माहित आहे का, या आकर्षक आवाजामागे कोण आहे? हा सुंदर आवाज आहे सरला चौधरी यांचा. सुमारे २८ वर्षे झाली त्यांचा आवाज रेल्वे स्थानकांवर ऐकू येत आहे. पूर्वी त्या स्व:ता रोज अनाउन्समेंटचे काम करत असत. नंतर त्यांचा आवाज रेकॉर्ड करून सर्व स्थानकांवर ऐकवला जाऊ लागला. कोण आहेत या सरला चौधरी आणि रेल्वेने त्यांच्या आवाजाला का दिली ही ओळख, ते जाणून घेवूयात.
सध्या काही महिन्यांपासून सरला चौधरी रेल्वेत अनाउन्सर पदावर नाहीत. परंतु, त्यांचा आवाज रेल्वेची एक ओळख झाला आहे. सरला चौधरी यांनी १९८२ मध्ये रेल्वेत अनाउन्सर पदासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी चाचणी दिली. यानंतर त्यांचे रोजंदारीवर काम सुरू झाले. नंतर १९८६मध्ये म्हणजे चार वर्षांनी त्या कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम करू लागल्या.
अशी होत असे रेकॉर्डिंग
हा काळ असा होतो जेव्हा संगणक नव्हते. यामुळे त्यांना खुप मेहनत करावी लागत होती. त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या स्थानकांवर जाऊन घोषणा करावी लागत होती. त्यांच्या एका मुलाखतीनुसार, तेव्हा रेल्वेची एक घोषणा रेकॉर्ड करण्यासाठी ३ ते ४ दिवस लागत असत. या घोषणा वेगवेगळ्या भाषेत रेकॉर्ड कराव्या लागत असत. नंतर काळ बदलला, नवे तंत्रज्ञान आले आणि रेल्वेने रेल्वे स्थानकातील सर्व अनाउन्सचे काम सांभाळण्याची जबाबदारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टमला दिली.
आजही घुमतो त्यांचा आवाज
सरला चौधरी यांनी १२ वर्षांपूर्वी अनाउन्सचे काम सोडले आहे. आता त्या ओएचई विभागात कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. असे असूनही सरला यांचा आवाज स्टँडबाय मोडवर सेव्ह करण्यात आला आहे. आजही आपण जेव्हा रेल्वने प्रवासाला निघतो, तेव्हा सरला यांचा आवाज आपल्या कानात घुमतो…यात्रीगण कृपया ध्यान दें, असा सरला यांचा आवाज ऐकू आला की प्रवाशी पुढील सूचना ऐकण्यासाठी सावध होतात. सरला चौधरी यांनी त्यांच्या एका मुलखतीमध्ये सांगितले होते की, जेव्हा माझ्या आवाजाची स्तुती लोक करतात तेव्हा मला खुप आनंद होतो. लोक त्यांना ओळखत नसले तरी त्यांच्या आवाजाला मात्र ओळखतात, यामुळे त्यांना आनंद होतो.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ ५ वनस्पती जवळपास ठेवल्या तर डास जातील पळून !
- ‘या’ ७ उपायांनी मासिक पाळीच्या वेदना होतील दूर !
- ‘सोशल मीडिया’वर सतत ‘अॅक्टिव्ह’ राहण्याचे ‘हे’ आहेत ३ दुष्परिणाम
- उपाशीपोटी ‘हे’ ७ पदार्थ चुकूनही खाऊ नका, जाणून घ्या परिणाम
- ‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक !
- ‘हे’ आहेत चॉकलेटचे ८ आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या
- सकाळी चालायला जाता, मग ‘ब्रिस्कवॉक’ घ्या, ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- मुळ्याचे ‘हे’ १५ आरोग्यवर्धक फायदे माहिती आहेत का ? जाणून घ्या
- पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे
- ‘हे’ तेल हृदयासाठी ‘टॉनिक’, 9 प्रकारच्या आजारांपासून ठेवतं दूर, जाणून घ्या
- उत्तम आरोग्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ नियमित खा, जाणून घ्या कोणते