उदगीर-जळकोट मधून भाजपचा उमेदवार कोण ?, इच्छुकांना लागले आमदारकीचे ‘वेध’ अन् कार्यकर्त्यांना उत्सुकता

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून. गेल्या दोन टर्म (दहा) वर्षांपासून आमदार सुधाकर भालेराव हे आमदार आहेत. त्यांनी 2174 कोटी रुपयांच्या विकास कामाचा निधी आपण उदगीर जळकोट मतदार संघात खर्च केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या उदगीर येथील महाजनादेशयात्रेच्या सभेत सांगितले. पण उदगीर जळकोट मतदारसंघात उमेदवार बदलाचे वारे जोरात वाहू लागले असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी गेल्या अनेक वर्षापासून आहे.

उदगीरमध्ये भाजपात दोन ते तीन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये कुणाच्या गटाचे वर्चस्व चालणार आणि नवीन उमेदवाराला संधी मिळणार का ? यासाठी कमालीची उत्सुकता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनतेमध्ये निर्माण झाली आहे. 2174 कोटी रूपयांची विकासाची कामे होऊन देखील आमदार सुधाकर भालेराव यांना या मतदारसंघातून विरोध का ? कार्यकर्त्यांची व जनतेची नाराजी का ? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळीला पडला आहे.

लातूर जिल्ह्यातील ईच्छूक उमेदवाराच्या मुलाखतीच्या दिवशी पक्ष निरीक्षक तथा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या समोर काही मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध करत आमदार सुधाकर भालेराव यांना उमेदवारी देऊ नये असे उघडपणे सांगत नवीन उमेदवाराला संधी द्यावी असे सांगितल्याने पक्ष सृष्टीला प्रश्न पडला आहे की नवीन उमेदवार द्यावा का ? यामध्ये नवीन इच्छुक उमेदवारांमध्ये विद्यमान आमदार सुधाकर भालेराव, डॉ अनिल कांबळे, विश्वजीत गायकवाड, नामदेव कदम यांची नावे आघाडीवर असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे.

उमेदवाराला उमेदवारीचे वेड लागले असून कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता उदगीर जळकोट मतदार संघात लागली आहे. विद्यमान आमदारचे तिकीट कापून नवीन उमेदवाराला उमेदवारी दिली तर निवडून येणार की नाही याची चाचपणी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी करत आहेत. जेणेकरून पक्षाचे नुकसान होणार नाही. याची मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून खात्री केली जात आहे.

Visit : policenama.com