‘WHO’ ने सांगितले देशात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्यांच्या सुरक्षित उपयोगाचे मार्ग

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने अँटोबायोटीकच्या सुरक्षित वापरासाठी जागतिक अभियान सुरु केले आहे. यामध्ये भारतासहित सर्व सदस्य देशांना अँटोबायोटिकच्या सुरक्षित उपयोगासाठी ऑनलाईन टूल वापरण्याचा आग्रह केला आहे. जीव वाचविण्यासाठी अँटोबायोटिकचा सुरक्षित वापर महत्वाचा ठरतो. अँटोबायोटिकचा सुरक्षित आणि प्रभावशाली वापर रुजविण्यासाठी हे अभियान जागतिक आरोग्य संघटनेने हाती घेतले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अँटोबायोटिकचे वर्गीकरण केले आहे. अँटोबायोटिक किती प्रभावशाली आहे या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणाचा उद्देश सुपरबग संक्रमणापासून वाचणे आणि व्हायरसचा प्रभाव कमी करणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व सदस्य देशांना या वर्गीकरणाची अंमलबजावणी करायला सांगितले आहे. भारताला देखील हा नवीन नयम लागू असेल. भारतामध्ये सर्वात जास्त अँटिबायोटिक विकली जातात. एक हजार पेक्षा जास्त किंमतींची अँटिबायोटिक भारतात विकले जाते.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजेंसीने सांगितले की, त्यांनी एक वर्गीकरण प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये सामान्य संक्रमण आणि धोकादायक संक्रमण यासाठी कोणत्या अँटिबायोटिकचा वापर केला पाहिजे आणि कोणती औषधे वापरली पाहिजेत याची माहिती देण्यात आली आहे. याचा उद्देश अँटिबायोटिकच्या प्रतिरोधापासून वाचणे हे आहे.

अँटोबायोटिक काय आहे?
अँटोबायोटिक हा एक ग्रीक शब्द आहे. यामध्ये अँटी म्हणजे विरोध आणि बायोस म्हणजे जिवाणू. जिवाणूला विरोध करणारे औषध म्हणजे अँटिबायोटिक होय. अँटिबायोटिक जीवाणापासून होणाऱ्या संक्रमणाला शरीराचे संरक्षण करते. शरीरात जेव्हा घातक जिवाणूंची वाढ होते तेव्हा आपण आजारी पडतो. शरीरात असणाऱ्या पांढऱ्या पेशी या धोकादायक जिवाणूंशी लढा देतात पण काही वेळा त्यांचा लढा कमी पडतो, अशा वेळी अँटिबायोटिकचा वापर केला जातो.

सुपरबग्जचा धोका कमी करणे हा आहे उद्देश
गेल्या काही दशकांपासून जिवाणूंनी अँटिबायोटिकवर कशी मात करायची याच तंत्र मिळवलं आहे. जिवाणूंनी असे ड्रग्ज तयार केले आहे ज्याचा सामना अँटिबायोटिकला देखील करता येत नाही. याला सूपरबग्ज असे म्हंटले जाते. अशी स्थिती खूप धोकादायक असते आणि अशा परिस्थितीत अँटिबायोटिकचा काहीही परिणाम जिवाणूंवर होताना दिसून येत नाही. सध्याच्या काळात अँटिबायोटिक प्रतिरोध सर्वात मोठा धोका आहे. यांमुळे २०५० पर्यंत ५ कोटी पेक्षा जास्त लोकांचा जीव जाऊ शकतो. हा आकडा जगभरातील आहे. ब्रिटिश सरकारने एंटीमाइक्रोबायल रेसिस्टेंस का रिव्यू करून हा आकडा सादर केला.

असे तयार होतात घातक सुपरबग जिवाणू
काही वेळा चुकीचे अँटिबायोटिक दिल्यामुळे अँटिबायोटिकचा सामना करणाऱ्या जिवाणूंची संख्या शरीरात वाढते आणि हेच जिवाणू सुपरबग्जचे रूप धारण करतात. यामुळे अँटिबायोटिकचा सुरक्षित आणि काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.

सुपरबग जिवाणूंचा कहर
सुपरबग जिवाणूचा धोका वाढतच चालला आहे. लान्सेट मासिकाच्या अहवालानुसार, २०१५ मध्ये सुपरबग जिवाणूमुळे जीव जाण्याचे भारतातील प्रमाण १३ % होते. विकसित देशामध्ये हा आकडा २ ते ७ % असा राहिला आहे. एका अहवालानुसार २०३० पर्यंत सुपरबगच्या संक्रमणाचा दर चालू दराच्या तुलनेने चार पट वाढण्याची शक्यता आहे.

सुपरबगच्या जिवाणूंवर अँटिबायोटिकचा कोणताही परिणाम होत नाही. या जिवाणूमुळे सामान्य आजाराची तीव्रता वाढून मोठा आजार होऊ शकतो. सुपरबग संक्रमण दोन पद्धतीने होऊ शकते. एक आहे मल्टी ड्रग रेसिस्टेंट आणि दूसरे एक्सट्रीमली ड्रग रेसिस्टेंट. याला रोखण्याचा एकच उपाय तो म्हणजे अँटिबायोटिक औषधांचा अनावश्यक आणि अयोग्य वापर टाळणे होय.

अँटिबायोटिक घेण्याआधी हे लक्षात घ्या
डॉक्टारांच्याच सल्ल्याने अँटिबायोटिकचा वापर करा कारण डॉक्टर आजारानुसार अँटिबायोटिक देतात.

अँटिबायोटिकचा वापर किती प्रमाणात करावा कोणत्या वेळी अँटिबायोटिक घ्यावे याचे ज्ञान आपल्याजवळ नसते.

डॉक्टरांच्या सल्यानुसार घेण्यात येणाऱ्या अँटिबायोटिकचा कोर्स पूर्ण केला पाहिजे, अन्यथा काही जिवाणू तसेच जिवंत राहतात आणि पुन्हा आक्रमण करतात.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

You might also like