टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींसह ‘ही’ पाच नावे चर्चेत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या पदांसाठी अर्ज मागवले असून यामध्ये आतापर्यंत पाच जण या शर्यतीत आघाडीवर असून कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे. कर्णधार कोहालीला मात्र या प्रक्रियेत विचारले जाणार नसल्याचे समजत आहे. त्यामुळे आता सल्लगार समिती काय निर्णय घेते त्यावर सर्व काही अवलंबून आहे.

खालील व्यक्ती होऊ शकतात भारताच्या प्रशिक्षक

१) रवी शास्त्री

भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांचे वय ५७ वर्ष असल्याने बीसीसीआय त्यांना पुन्हा संधी देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण बीसीसीआयने प्रशिक्षक हा ६० वर्ष वयाच्या आतील असावा अशी अट ठेवली असल्याने रवी शास्त्री यांना संधी मिळते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२) वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज देखील प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीमध्ये आहे. २०१७ मध्ये देखील त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. सेहवागकडे आयपीएलमध्ये पंजाब संघाचा मेंटॉर म्हणून अनुभव देखील आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या सर्व अटींमध्ये तो बसतो देखील. त्यामुळे आता त्याची निवड होते कि नाही हे पाहावे लागणार आहे.

३) गॅरी कर्स्टन

२०११ मध्ये भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गॅरी कर्स्टन यांनी देखील भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. त्यांचं वय सध्या ५१ वर्ष ऑन त्यांच्याकडे या पदासाठीचा दीर्घ अनुभव देखील असल्याने या पदासाठी ते उजवे ठरणार आहेत.

४) टॉम मूडी

ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा तगडा अनुभव असून त्यांनी याआधी श्रीलंका संघाला देखील प्रशिक्षण दिले आहे. २००७ मध्ये त्यांनी श्रीलंकन संघाला फायनलमध्ये घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांचे वय सध्या ५३ वर्ष असून ते देखील या शर्यतीत पुढे आहेत.

५) महेला जयवर्धने

श्रीलंकेचा माजी फलंदाज माहेला जयवर्धने देखील या पदासाठी इच्छुक असून त्याने देखील अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे प्रशिक्षकपदाचा दीर्घ अनुभव देखील आहे.

६) माईक हेसन

न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन हा देखील भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी शर्यतीत आहे. ४४ वर्षीय माईक हेसन यांच्याकडे न्यूझीलण्ड संघाच्या प्रशिक्षकपदाचा दीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर तो सध्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा देखील प्रशिक्षक आहे.

दरम्यान, कर्णधार विराट कोहली याला संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच हवे असल्याने आता नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर रवी शास्त्री यांची पुन्हा यापदी निवड झाली तर मला नक्कीच आनंद होईल असे विराट कोहली याने म्हटले होते. त्याचबरोबर मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडते असेही विराट कोहली म्हणाला होता.

आरोग्यविषयक वृत्त