हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या ट्रायलवर WHO कडून बंदी, जे ‘मेडिसीन’ कोरोना वॉरियर्सला देतेय भारत सरकार

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोना महामारीच्या उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या ट्रायलवर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. डब्ल्यूएचओ महासंचालक डॉक्टर टेड्रोस यांनी म्हटले की, सामान्यपणे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि क्लोरोक्वीन ही औषधे ऑटोइम्यून आजार किंवा मलेरियाच्या रूग्णांसाठी सुरक्षित आहेत, परंतु हृदयाशी संबंधित समस्यांवर या औषधांनी वाईट परिणाम दर्शवले आहेत.

नुकतेच आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध मासिक लॅन्सेटमध्ये दावा करण्यात आला होता की, मलेरियाच्या उपचारात वापरण्यात येणारे औषध क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) चा कोविड-19 च्यारूग्णांना फायदा होत असल्याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. यामध्ये ताज्या संशोधनाचा संदर्भ देत दावा केला होता की, मर्कालाईडशिवाय किंवा त्यासोबत सुद्धा या दोन्ही औषधांच्या वापराने कोविड-19 रूग्णांचा मृत्यूदर वाढतो. हे संशोधन सुमारे 15 हजार कोविड-19 रूग्णांवर करण्यात आले होते.

तर, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेला (आयसीएमआर) एका रिसर्चमध्ये आढळले की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेतल्याने कोविड-19 मुळे संसर्गाची शक्यता कमी होते. यानंतर भारत सरकारने कोविड-19 पासून वाचण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) चा वापर आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला. आयसीएमआरने मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे औषध क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरासाठी नवी दुरूस्त गाईडलाईनसुद्धा जारी केली आहे.

ट्रम्प यांचा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोर्स पूर्ण

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-19 पासून वाचण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचे सेवन करणे नुकतेच बंद केले आहे. चांगली बाब ही आहे की, हे औषध त्यांनी मधूनच सोडले नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, व्हाईट हाऊसमध्ये दोन स्टाफ कोरोना संक्रमित सापडले होते. ज्यानंतर त्यांनी संसर्गापासून वाचण्यासाठी दोन आठवड्यांचा कोर्स करण्यास सुरूवात केली होती. आता ते ठिक आहेत, म्हणून औषध बंद केले आहे. ट्रम्प म्हणाले, मी झिंकसोबत रोज एक गोळी घेत होतो. मी या गोळ्यांबाबत चांगले ऐकले होते. अनेक चांगल्या बातम्या ऐकल्या होत्या.