Coronavirus : WHO चा दावा – ‘फेस’ मास्क ‘कोरोना’पासून वाचवू शकत नाही, मास्क वर किती तास जीवंत राहतो व्हायरस ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात 13 लाखा पेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. तर 74 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीत झाल असून इटलीत 16 हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 13 हजार 341, अमेरिका 10 हजार 871, फ्रान्स 8 हजार 911 आणि ब्रिटनमध्ये 5 हजार 373 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 67 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात देखील झाला असून आतापर्यंत 4 हजार 778 जणांना कोरनाची लागण झाली आहे. तर 136 जणांचा मृत्यू झाला आहे.

मोठ्या प्रमाणात फैलावत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सामाजिक अंतर. दरम्यान, कोरोना टाळण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करत आहेत. यातील एक तोंडाला मास्क लावणे. मात्र एक प्रश्न उपस्थित होत आहे की, मास्क आपल्याला कोरोना विषाणूपासून वाचवू शकतो का ?

जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली आहे की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी फक्त मास्क वापरणे एवढेच नाही. या विषाणूने जगभरात आतापर्यंत 70 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अडनॉम ग्रॅब्युएरास यांनी सांगितले की, मास्क केवळ संरक्षण म्हणून घालू शकता. मात्र हा काय उपाय नाही. मास्क घालण्याने फक्त कोरोनाला रोखू शकतो.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कवर कोरोनाचा विषाणू एक आठवडा जिवंत राहू शकतो तर बँकेतील नोटा, स्टील आणि प्लास्टीक च्या पृष्ठभागावर हा विषाणू कित्येक दिवस जिवंत राहू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. घरगुती कीटकनाशके, ब्लीच आणि साबणाने सतत हात धुतल्याने या व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.

स्टील आणि प्लास्टिक
हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासाच्या निष्कर्षावर आधारीत असे म्हटले आहे की, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर हा विषाणू चार दिवस जिवंत राहू शकतो. हाँगकाँग विद्यापीठातील स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे लिओ पून लिटमॅन मलिक पेरिस यांनी सांगितले की, अनुकूल परिस्थितीत हा विषाणू बराच काळ कार्यरत राहतो. मात्र, प्रमाणित किटकनाशकाने हात स्वच्छ धूतल्यास या विषाणूपासून सहजपणे दूर राहता येऊ शकते.

मुद्रीत (छापील) कागद आणि टिश्यू पेपर
संशोधकांनी खोलीच्या तापमानात वेगवेगळ्या पृष्ठभागावर हा विषाणू सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. त्यांना असे आढळून आले की, मुद्रीत (छापील) कागद आणि टिश्यू पेपरवर हा विषाणू तीन तास जिवंत राहू शकतो. तर लाकडू आणि कापडावर एक दिवस जिवंत राहू शकतो. काच आणि चलनी नोटांवर चार दिवस हा विषाणू जिवंत राहतो. स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावरून हा व्हायरस नष्ट होण्यास चार ते सात दिवस लागतात.

कोरोनाच्या सक्रियतेबाबत अहवाल प्रसिद्ध
कोरोनाच्या सक्रियतेबाबत मागील महिन्यात नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन संशोधकांच्या अहवालात कोरोना वेगवेगळ्या पृष्ठभागावर सक्रीय होण्याबाबत सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये व्हायरस प्लास्टिक आणि स्टिलच्या पृष्ठभागावर 72 तास आणि तांब्याच्या पृष्ठभागावर हा विषाणू 24 तास सक्रीय असतो.

वारंवार हात धुणे हाच व्हायरसपासून बचाव होण्याचा मुख्य उपाय
हाँगकाँग विद्यापीठाच्या दोन्ही संशोधकांनी सांगितले की, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात धुणे. हात स्वच्छ धुतल्यानंतरच आपल्या तोंडाला किंवा डोळ्यांना स्पर्श केला पाहिजे. कारण संसर्ग होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.