‘सरकार दारूड्यासारखं वागतंय’, प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –‘देशातील पब्लिक सेक्टर हे पब्लिक सेक्टर न राहता प्रायव्हेट सेक्टर होत आहे. बँका डुबल्या आहेत. देशातील भारत पेट्रोलियम, एअर इंडिया या कंपन्यांची विक्री सरकारकडून होत असून आणखी काही सरकारी कंपन्याही या रांगेत आहेत, स्वत:ला देशभक्त म्हणणारे देश विकणारे झालेत,’ अश्या शब्दात वंचित बहुजन महाआघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली.

सरकारचा महसूल पूर्णपणे ढासळला असल्याने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग सरकार विकत आहे. ज्याप्रमाणे दारूडा आपल्या घरातील सामान आणि बायकोचे दागिने विकतो, तसेच हे सरकार नवरत्न म्हणजे देशाचे दागिने विकण्याचं काम करत आहे, असा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

तसेच, यावर आंबेडकर यांनी काही मार्गदेखील सुचवले आहे. शेअर मार्केटमध्ये भारत पेट्रोलियम आणि एअर इंडियाच्या शेअर्सची माहिती सर्वांना आहे. त्यामुळे, सरकारने एक समिती नेमूण नागरिकांना हे शेअर विकत घेतले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सूचवले आहे. सरकारने लोकांना शेअर विकून नागरिकांना सोबत घेऊन हे नवरत्न सरकारमार्फत सुरू ठेवावेत, लाखो लोकं यामध्ये सहभागी होती, असे देखील आंबेडकरांनी सांगितले.

तसेच, यासाठी आम्ही सरकारला १५ दिवसांचा अवधी देतोय, असेही ते म्हणाले. अन्यथा, निवृत्त न्यायाधीशांना सोबत घेऊन आम्ही एक समिती नेमणूक करुन, देशातील नागरिक एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिमयचे शेअर किती रुपयांना विकत घेतील, याचा अभ्यास करू.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/