यूरोपच्या 8 देशांमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन : WHO

जिनिव्हा : कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने संपूर्ण जग दहशतीखाली आहे, परंतु डब्ल्यूएचओनुसार (WHO) आतापर्यंत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन (Corona virus new strain)आठ युरोपीय देशांमध्ये आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे(World Health Organization) यूरोप क्षेत्राचे संचालक हंस क्लूगे यांनी ही महिती ट्विट करून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, डब्ल्यूएचओच्या युरोपीय केंद्राला आठ देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन वोक-202012/01 आढळला आहे. सध्या सुरक्षात्मक उपाय जसे की, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, कोअर सपोर्ट बबल्समध्ये राहणे महत्वाचे आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, डब्ल्यूएचओ सतत लक्ष ठेवून आहे आणि लेटेस्ट माहिती प्रदान करत राहील. कोरोनाचा नवा स्ट्रेन जुन्या व्हायरसच्या उलट तरूणांमध्ये जास्त पसरत आहे. त्यांनी म्हटले की, सतर्कता महत्वपूर्ण आहे. याचा प्रभाव ठरवण्यासाठी संशोधन सुरू आहे. ब्रिटनमध्ये मागील आठवड्यात कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळला होता, जो जुन्या व्हायरसपेक्षा 70 टक्के जास्त पसरत आहे. यानंतर संपूर्ण युरोपने स्वत:ला ब्रिटनपासून वेगळे केले आहे आण आपली विमानसेवा बंद केली आहे.

इकडे, फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक मीडियाने ही माहिती दिली आहे. बीएफएमटीव्हीने आरोग्य मंत्रालयाच्या संदर्भाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, ब्रिटनमधून अलिकडे परतलेला एक फ्रान्सचा नागरिक ट्यूर्स शहरात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने ग्रस्त आढळला आहे. चॅनलने सांगितले की, या व्यक्तीमध्ये संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत आणि सध्या तो क्वारंटाइनमध्ये आहे.