Vaccine : गरोदर महिला सुद्धा घेऊ शकतात कोरोना व्हॅक्सीन – WHO

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आपल्या जुन्या भूमिकेत बदल करत गरोदर महिलांसाठी कोविड-19 व्हॅक्सीन घेणे धोकादायक नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वी संघटनेने गरोदर महिलांना सध्या व्हॅक्सीन देऊ नये, असे निर्देश सर्व देशांना दिले होते.

डब्ल्यूएचओने शुक्रवारी म्हटले, गरोदरपणात महिलांना गंभीर स्तराच्या कोविड-19 चा धोका सर्वात जास्त असतो, परंतु गरोदरपणात व्हॅक्सीन सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी खुप कमी आकडेवारी उपलब्ध आहे.

डब्ल्यूएचओने म्हटले, तरी सुद्धा आमच्याकडे अशा व्हॅक्सीनची माहिती उपलब्ध आहे, त्यावर असे मानण्याचे कोणतेही प्रमुख कारण नाही की असा कोणताही विशेष धोका होईल, जो गरोदर महिलांना व्हॅक्सीन दिल्याने होणार्‍या सर्व लाभांच्या पुढे जाईल.

डब्ल्यूएचओने म्हटले, यामुळे ज्या गरोदर महिलांमध्ये (आरोग्य कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी) सार्स-कोव्ह-2 व्हायरसच्या संपर्कात येण्याचा धोका सर्वात जास्त आहे किंवा अशी समस्या आहे, जी गंभीर आजाराचा धोका वाढवते, त्यांना त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने कोरोना व्हॅक्सीन दिली जाऊ शकते.