ड्रग केसमध्ये नाव आलेली अन् NCB च्या रडारवर असलेली सिमोन खंबाटा आहे तरी कोण ?

ड्रग केसमध्ये बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची नावं समोर आली आहेत. यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. सुशांत संबंधित ड्रग केसमध्ये अद्याप रिया चक्रवर्तीपासून तर दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची नावं समोर आली आहेत. या सर्वांसोबतच आणखी एक नाव वारंवार समोर येत आहे ते म्हणजे सिमोन खंबाटा. सिमोन रियाची मैत्रिण आहे. रियाच्या व्हॉट्सॲप चॅटमधून तिचं नाव समोर आलं होतं. सिमोन खंबाटा आहे तरी कोण हे अनेकांना माहिती नाही. अनेकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

कोण आहे सिमोन खंबाटा ?

सिमोन खंबाटा ही एक फॅशन ब्लॉगर आणि सोशल मीडिया पर्सनॅलिटी आहे. तिच्या Mama Says या युट्युब चॅनलसाठी ती ओळखली जाते. सिमोन तिच्या मुलासोबत या चॅनलवर दिसत असते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती पॅरेंटींगबाबत सल्ला, एक्सपर्ट स्लाग, मुलांचा सांभाळ, त्यांचं आरोग्य, लाईफस्टाईल आणि न्युट्रीशनबद्दल माहिती देत असते. असंही सांगितलं जातं की, अभिनेता रणवीर सिंगचीही ती चांगली मैत्रीण आहे.

सिमोन खंबाटा जन्म हा दुबईत झाला असून ती तिथचं वाढली आहे. तिनं तिचा बॉयफ्रेंड करण पंथाके सोबत लग्न केलं आहे. सिमोनला 2 मुलं आहेत. मुलगी सेरेना आणि मुलगा जेफर अशी त्यांची नावं आहेत. जेव्हापासून सिमोनचं नाव ड्रग केसमध्ये आलं तेव्हापासून तिनं तिचं इंस्टा अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे.

सुशांत केस आणि ड्रग केसमध्ये दीपिका पादुकोण, सिमोन खंबाटा आणि रकुलप्रीत सिंह यांची चौकशी केली जाणार आहे. यांची सर्वांची नावं ही जया साहानं सांगितली आहेत. जयानंच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचं नाव सांगितलं होतं. आता एनसीबी सिमोनला समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like