मोठ्या घोषणांचे ‘फटाके’ फोडायला सुरुवात केली कोणी ? शिवसेनेचा PM मोदींना ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मोदी यांनी अलीकडेच सर्व मंत्र्यांना तंबी दिली की, उगाच मोठ्या घोषणा करु नका, ज्या घोषणा पूर्ण करता येणार नाहीत त्या करु नका, याचा अर्थ घोषणाबाजी बंद करणे हाच आहे. मंदी आहे व घोषणा करुन लोकांना आशेला लावू नका, पण अशा मोठ्या घोषणांचे फटाके फोडायला सुरुवात केली कोणी ? असा प्रश्न उपस्थित करीत सामना मधून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनतृतीयांश बहुमत मिळेल, असा भाजपाचा सर्व्हे काल माध्यमांसमोर आला. त्यात महायुतीला २२९ जागा मिळतील, असे सांगण्यात आले. त्यात सर्व्हेमध्ये भाजपाला स्वबळावर १६० जागा मिळतील असे दर्शविले आहे. हा शिवसेनेला इशारा असल्याचे सागितले जात होते.

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकेच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी जोरदार घोषणा केल्या होत्या. स्वित्झरलँडच्या बँकेतून काळा पैसा देशात आणणार, प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशा अनेक घोषणा केल्या होत्या. पण त्यातील एकही घोषणा प्रत्यक्षात आल्या नाहीत. त्यामुळे विरोधकांनी फेकू म्हणून सोशल मिडियावर नरेंद्र मोदींवर असंख्य विनोद टाकून यथेच्छ टवाळी केली जात होती. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने बालाघाट येथील दहशतवाद्यांचा तळ उद्वस्थ केला. त्याचा पुरेपुर फायदा घेत मोदींनी तो निवडणुकीचा विषय बनविला. त्यामुळे सर्व मुद्दे, विषय बाजूला पडले व केवळ पाकिस्तानावरील कारवाई, बदला हेच निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिले व भाजपाला अभुतपूर्व यश मिळाले.

आताही आर्थिक स्तरावर मंदी आहे, पण फेका फेकीत अजूनही पुढेच आहोत, अशा प्रकारच्या विनोदातून मोदी यांच्यावर अजूनही सोशल मिडियावर निशाणा साधला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सध्या युतीमध्ये सुरु आहेत. त्यावेळीच भाजपाने हा सर्व्हे व्हायरल केला आहे. त्यातून शिवसेनेला आम्हाला १६० जागा मिळणार आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच शिवसेनेने पुन्हा आपला फणा काढला असून आम्हाला डावलले तर आम्ही काय करु शकतो, याची झलक दिली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.

जागा वाटपात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी युतीतील या पक्षांकडून हे चालले असल्याचे सांगितले जात आहे. त्यातूनच शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून आपले तीर मारले आहेत. आता ते बरोबर मर्मस्थानी लागतात का हे पहायचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –