Video : आता ‘कोरोना’सोबत जगायला शिका, तरुणांमध्ये देखील मृत्यूचा धोका : WHO नं सांगितलं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी चेतावणी दिली की, सध्या कोरोना विषाणूची लस तयार होण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत जगाने कोरोना सोबतच जगायला शिकले पाहिजे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस ॲधानम म्हणाले आहेत की, जगाने कोरोना विषाणूसोबत जगणे ‘शिकले पाहिजे’. डब्ल्यूएचओने असा इशारा दिला आहे की, जर तरुण असा विचार करीत आहेत की, त्यांना विषाणूचा धोका नाही तर ते चुकीचे आहे. केवळ संसर्गामुळे तरुणांचा मृत्यू होऊ शकत नाही, तर बर्‍याच दुर्बल घटकांमध्ये ते पसरवण्याचेही काम करत आहेत.

पत्रकार परिषदेत टेड्रॉस म्हणाले की, ‘आपण सर्वांनी या विषाणूंसह जगायला शिकले पाहिजे आणि स्वतःचे व इतरांचे जीवन वाचवताना आयुष्य जगण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे’. तसेच अनेक देशांमध्ये पुन्हा जारी केलेल्या निर्बंधांचे त्यांनी कौतुक केले. टेड्रॉस यांनी सौदी अरेबियाने लादलेल्या निर्बंधांचा उल्लेख केला आणि सौदी सरकारच्या पाऊलांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, अशी कठोर पावले उचलून सरकारने एक उदाहरण ठेवले आहे की, आजच्या युगाच्या बदललेल्या वास्तवासोबत जुळवून घेण्यासाठी ते काय करू शकतात.

ही लस येण्यास एक वर्ष लागेल
ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस किती प्रभावी ठरेल किंवा नाही याबद्दल आम्हाला माहिती पडेलच. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरिओ यांनी म्हटले आहे की, ‘या विषाणूचे वर्तन अत्यंत अनिश्चित आहे. अशा परिस्थितीत, लसचा डोस पुरेसा आहे की नाही, हे आता सांगता येणार नाही. कंपनी म्हणाली की ‘आम्हाला आशा आहे की, ही लस किमान 12 महिन्यांपर्यंत प्रभावी राहिल.

तथापि, आम्ही आशा करतो की, हे दोन वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ प्रभावी ठरू शकेल. ‘ कंपनीचे म्हणणे आहे की, जर त्याचा प्रभाव फक्त एक वर्षासाठी टिकला तर फ्लूच्या लसप्रमाणे दरवर्षी डोस देणे आवश्यक असेल.

मोठ्या प्रमाणावर ही लस तयार करणार्‍या अ‍ॅस्ट्रझेनिका या कंपनीने पूर्वीची लस पुरवण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपच्या समावेशक लस युतीशी करार केला आहे. या योजनेनुसार काम केले तर वर्षाच्या अखेरीस या लसीचा पुरवठा सुरू होईल, अशी कंपनीला आशा आहे.

या लसीच्या मानवी चाचण्या ब्रिटन, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका येथे सुरू असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. लवकरच त्याचे निकालही समोर येतील. सुरुवातीच्या चाचणीत असे आढळले आहे की, ही लस शरीराच्या रोग प्रतिरोधक शक्तीला रोगाशी लढण्यासाठी शिकवण देऊ शकते. तथापि, व्हायरस संरक्षणासाठी हे पुरेसे आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.