कोण होती ‘रावणा’ची पत्नी ‘मंदोदरी’ ? दशानंदाच्या मृत्यूनंतर केला होता ‘विभीषणा’सोबत विवाह ? जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या डीडीवरील रामायण ही मालिका खूप लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. यात रावणाचा वध झाल्यानंतर हे दाखवण्यात नाही आलं की, पुढे रावणाची पत्नी मंदोदरी हिचं काय झालं. मंदोदरी नेमकी कोण होती याची माहितीही रामायणमध्ये देण्यात आलेली नाही. हेही नाही दाखवलेलं की, मंदोदरी विभीषणासोबत लग्न का करावं लागलं.

पुराणांमध्ये केलेल्या उल्लेखानुसार, मधुरा नावाची एक अप्सरा कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या शोधात आली होती. जेव्हा ती शंकराजवळ आली तेव्हा तिथं पावर्ती नाही हे पाहून तिनं शंकराला भुरळ घालण्याचे प्रयत्न केले. यानंतर काही वेळानं पार्वती जेव्हा तिथं आली तेव्हा तिनं मधुराच्या शरीरावर शंकरावर भस्म पाहिलं. यानंतर ती क्रोधित झाली आणि तिनं मधुराला शाप दिला की, ती 12 वर्ष बेडूक बनून राहिल आणि एका विहिरीत तिचं वास्तव्य असेल. यानंतर मुधुराचं कष्टदायी जीवन सुरू झालं. तिला आपल्या चुकीची शिक्षा भोगावी लागली.

जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा कैलासावर असुर राजा मायासूर आपल्या पत्नीसोबत तपश्चर्या करत होता. दोघांनाही एक मुलगी हवी होती. दोघांनी 12 वर्ष तप केलं. इथं मधुराच्याही शापाचा अंत झाला आणि ती विहिरीतच रडू लागली. असुरराज आणि त्याच्या पत्नीनं या विहिरीच्या बाजूलाच तपश्चर्येत लीन होते. जेव्हा त्यांनी रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ते विहिरीच्याजवळ आले आणि त्यांना मधुरा दिसली जिनं त्यांना पूर्ण कहाणी सांगितली. असुरराजनं तपश्चर्या सोडून मधुरालाच आपली मुलगी मानलं. मधुराचं नाव बदलून मंदोदरी करण्यात आलं.

असुरराजाच्या महलात मंदोदरी राजुकमारीचं आयुष्यता जगत होती. अशात तिच्या आयुष्यात रावणाची एन्ट्री झाली. जेव्हा मायासूरला भेटण्यासाठी रावण आला तेव्हा त्यानं मंदोदरीला पाहिलं आणि मोहित झाला. त्यानं मायासूरकडे मंदोदरीचा हात मागितला. परंतु त्यानं हा प्रस्ताव नाकारला. रावणानं क्रोधित होऊन मंदोदरीचं अपहरण केलं. दोन्ही राज्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. मंदोदरीला माहिती होतं की रावण तिच्या वडिलांपेक्षा जास्त शक्तीशाली शासक आहे. यासाठी मंदोदरीनं रावणासोबत राहणं मान्य केलं.

रामायणातही मंदोदरीला खूप नैतिक दाखवलं आहे. रावणानं जेव्हा सीतेचं हरण केलं तेव्हा मंदोदरीनं याचा विरोध केला होता. रावणाला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की, दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करणं अपराध आहे. अखेर रावणाचा शेवट झाला.

विभीषण सोबत विवाह

रावणाच्या मृत्यनंतर भगवान रामानं मंदोदरीला विभीषणसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु तिनं हा प्रस्ताव नाकारला होता. असं सांगितलं जातं की, यानंतर पुन्हा एकदा भगवान राम, सीता आणि हनुमान मंदोदरीला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा तिनं हा प्रस्ताव स्विकारला होता आणि विभीषणसोबत लग्न केलं होतं.