विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी ‘या’ 6 पैकी एक ‘नाव’ राज्यपाल फायनल करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरु असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विधिमंडळातून सहा ज्येष्ठ आमदरांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी, दिलीप वळसे पाटील या सहा दिग्गज नेत्यांच्या नावाची यादी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. विधीमंडळाने राज्यापालांना पाटवलेल्या यादीमध्ये कालिदास कोळंबकर यांच्या नावावर हंगामी अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण भाजपने एका पत्रकार परिषदेमध्ये कोळंबकर यांचा उल्लेख सर्वात ज्येष्ठ विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे.

कोण आहेत कोळंबकर ?
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी कोळंबकर हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ नेते असल्याचे सांगितले होते. शेलार यांच्या या उल्लेखाने सगळ्यांच्या भुवया उचावल्या. कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळा निवडून आले होते. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची आधी ओळख होती. मात्र, कोळंबकर हे नारायण राणे यांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. मागील काही वर्षापासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती.

Visit : Policenama.com