मोदींच्या मंत्री मंडळात ‘यांना’ मिळणार गृहमंत्री पद ?, अनेक नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील लोकसभा निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून एनडीए बहुमतांनी सरकार स्थापन करणार आहे. निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया पूर्णत्वास येत असतानाच पंतप्रधान मोदींच्या मंत्री मंडळात कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार याकडे सर्वांची नजर आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्री मंडळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गृहमंत्री पद मिळेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यासोबतच नवीन मंत्री मंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात एनडीए दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करीत आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध व सक्षम प्रचारयंत्रणा राबविली. त्यामुळे देशातील राजकीय समीकरणे पुन्हा बद्दलत एनडीएला बहुमतापर्यंत पोहचता आले. आता एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार असून नवीन मंत्री मंडळाचा शपथविधी लवकरच होणार आहे. या मंत्री मंडळात देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शाह यांची वर्णी लागेल अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे. त्या सोबत गेल्या मंत्री मंडळात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असून नवीन मंत्री मंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Loading...
You might also like