काय हा कॉन्फिडन्स ? कोण जिंकणार यावर लावली १ लाखांची पैज

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाची लोकसभा निवडणूक खूप प्रतिष्ठेची मनाली जात आहे. सांगली जिल्ह्यात कोण निवडून येणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र सांगलीतल्या दोन पठ्ठ्यानी आपलाच उमेदवार निवडून येणार याबाबत चक्क पैजेचा फड रंगवला आहे. मिराज तालुक्यातील म्हैसाळ जिल्हा परिषद गट नेते राजु कोरे यांनी संजयकाका पाटील पुन्हा खासदार होणार म्हणुन १ लाख रुपयांची पैज लावली आहे तर उमेदवार विशाल पाटील हे विजयी होणार म्हणून रणजित देसाई यांनीही एक लाख रुपयांची पैज लावली आहे. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही तर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर दिले हमी पत्र देखील दिले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिलला मतदान झाले आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशालदादा पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. भाजपचे उमेदवार संजयकाका निवडून येणार असा राजकुमार कोरे यांचा दावा आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल दादा पाटील निवडून येणार असा दावा रणजित देसाई यांनी केला आहे.

भाजप विजयी झाल्यास रणजित देसाई यांनी कोरे यांना १ लाख देणे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना विजयी झाल्यास कोरे यांनी १ लाख रुपये रक्कम रणजित देसाई यांना द्यायचे ठरले आहे. याबाबत हमीपत्र देण्यात आले असुन येत्या २३ तारखेला निकाल लगल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ तारखेला ही रक्कम पैज जिंकणाऱ्याला देण्यात येणार आहे. या पैजेचा बेअरर चेक दोघांनी सदानंद औन्धे यांना देण्यात आला आहे. सदानंद औन्धे हे पैज जिंकणाऱ्या व्यक्तीला ठरलेल्या पैजेप्रमाणे चेक देणार आहेत. असे हमीपत्रात नमूद केले आहे.

या पैजेची चर्चा रंगली असून आता २३ मी रोजी येणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे. या पैजेमध्ये कोण बाजी मारणार कुणाला १ लाखाची रक्कम मिळणार याबाबत उत्सुकता आहे.