ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा ते अजूनही गल्लीबोळात : आठवलेंचा आंबेडकरांना नाव न घेता टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत,  इतकेच नव्हे तर ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

दादर येथील आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. दरम्यान  ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. अहंकारातून होणाऱ्या टीकेमुळे आपले काम थांबवायचे नाही तर ती टीका गाडून पुढे जायचे असते. इतकेच नव्हे तर ज्यांच्या डोक्‍यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत. विशेष म्हणजे हल्ले झाले म्हणून मी घरी बसणार नाही.तसेच काम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीवर अहंकारातून हल्ले होतात. माझ्यावर ज्यांनी अटॅक केला त्यांना हार्ट अटॅक येतो असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मी मंत्रिपदासाठी काम करीत नाही. मी जिथे जातो त्यांना सत्ता मिळते. १९९० मध्ये कॉंग्रेस सोबत युती केली त्यावेळी  शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला मंत्री केले, तसेच शिवशक्ती आणि भीमशक्ती युती केली. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.याचबरोबर एनडीए ची सत्ता आली आणि मला मंत्रिपद मिळाले. मी स्वतःला विद्वान नेता असे समजत नसून मी कायम कार्यकर्ता आहे. असेही त्यांनी म्हंटले.