म्हणूनच मि.परफेक्शनिस्टचे इन्स्टाग्राम खाते आहे हटके

आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’. त्याची प्रत्येक गोष्ट हटके असते अगदी सोशल मीडिया खातेसुद्धा! इतक्या भन्नाट कल्पना आमिरकडे असतात. त्याचे चित्रपट, त्याने साकारलेल्या भूमिका, कथा, त्याची विविध रुपं, समाजासाठी तो राबवत असलेले उपक्रम हे सारे काही हटके स्टाईल आहे. कोणत्याही ‘रिअॅलिटी शो’ किंवा ‘अवॉर्ड शो’मध्ये त्याची अनुपस्थिती, प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणे, त्याचे हे वागणे त्याला इतर सेलिब्रिटींपेक्षा नेहमीच वेगळे ठरवत असते. त्याचं हेच वेगळेपण त्याच्या इन्स्टाग्राम खात्याबाबतही प्रकर्षाने दिसून आले.

म्हणूनच मि.परफेक्शनिस्टचे इन्स्टाग्राम खाते आहे हटके

आमिरने ५३ व्या वाढदिवसा निमित्त इन्स्टाग्रामवर पदार्पण केले. इन्स्टाग्राम खात्यावर त्याने आपल्या आईचा फोटो पोस्ट केला होता.‘आज मी जो आहे ते केवळ आणि केवळ तिच्यामुळेच आहे’ असे लिहित आमिरने आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती समोर आणली. त्यानंतर आईच्या फोटोंची कोलाज पोस्ट हटवत आमिरने त्याच जागी मुलगा आझादचा फोटो शेअर केला. आझादच्याही फोटोंचे कोलाज हटवत आमिरने काही तासांपूर्वी नवी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये आमिर काही शालेय विद्यार्थ्यांसोबत होता. सलग दुसऱ्यांदा आमिरने आपले फोटो हटवले आहेत. तिन्ही वेळा आमिरने एकूण नऊ फोटोंचे कोलाज शेअर केले. त्यामुळे नऊ फोटोंचे कोलाज टाकण्यामागे आमिरचा नेमका काय उद्देश्य होता हे अजूनही गुलदस्त्यात आहे. अर्थात तो मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट हटके करण्यात आमिरचा हातखंडा आहे.

म्हणूनच मि.परफेक्शनिस्टचे इन्स्टाग्राम खाते आहे हटके

याबाबत मात्र अजून आमीर खानने मौन सोडले नाही. इन्स्टावर अनेक सेलिब्रिटी आहेत पण कोणीही आमिरसारखा हटके फंडा वापरून पोस्ट केलेलं कोणीच नाही. आणि म्हणूनच बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रिटींपेक्षा आमिरचे खाते खास आहे तुम्ही पाहिले नसेल तर जरूर पहा.