‘या’ मोठ्या कारणामुळे व्हॅक्सीनेशननंतर सुद्धा लोक होताहेत कोरोना संक्रमित; डॉक्टरांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी कोरोना व्हॅक्सीनेशन अभियान देशात सुरू आहे. देशभरात आतापर्यंत 18 कोटी 40 लाख 53 हजार 149 लोकांना व्हॅक्सीनचा डोस दिला गेला आहे. परंतु याबाबत सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा लोकांना कोरानाचा संसर्ग का होत आहे.

देशातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. के. के. अग्रवाल यांचे काल निधन झाल्यानंतर व्हॅक्सीनेशनबाबत जास्त चर्चा होऊ लागली आहे. डॉक्टर के. के. अग्रवाल यांनी कोरोना व्हॅक्सीनेशनचे दोन्ही डोस घेतले होते. तरी ते कोरोना संक्रमित झाले आणि त्यांना जीव गमवावा लागला. सुमारे एक आठवडा त्यांच्यावर एम्स, नवी दिल्लीत डॉक्टरांची एक विशेष टीम उपचार करत होती. काल रात्री त्यांचे निधन झाले होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी आणि फायनान्स सेक्रेटरी डॉ. अनिल गोयल यांचे म्हणणे आहे की, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर के.के. अग्रवाल यांच्या प्रकरणात अनेक विविध कॉम्प्लिकेशन असू शकतात. यामध्ये मोठे कारण कोमोडिटी डिसीज असू शकते. यामुळे हाय रिस्क जास्त वाढली.

कोमोडिटी डिसीजमध्ये हार्ट, ब्लड प्रेशर, डायबिटीज, फुफ्फुसे आणि दुसर्‍या अनेक आजारांचा समावेश आहे. यामुळे मृत्यू होऊ शकतो. असे नाही की, एक किंवा दोन डोस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होणार नाही. यापासून वाचण्यासाठी सर्व खबरदारी घेतली पाहिजे.

डॉक्टर गोयल सांगतात, की कोरोना व्हॅक्सीनेशननंतर पहिला डोस घेतल्यानंतर आवश्यक आहे की, एक महिन्यानंतर आपली अँटीबॉटी टेस्ट करावी किंवा त्याची चेकअप करावी. 70 ते 90 टक्केमध्ये कोरोना व्हॅक्सीनेशन नंतर अँटीबॉडी बनण्यास सुरूवात होते. तर, व्हॅक्सीननंतर कोरोना संक्रमित होण्यामागे मोठे कारण हे असते की, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे.

डॉक्टर गोयल हे सुद्धा सांगतात की, कोरोना व्हॅक्सीनेशन झाल्यानंतर हा विचारणे की व्हॅक्सीन घेतली आहे तर कोरोना होणार नाही हे चुकीचे आहे. हा म्युटंट व्हायरस आहे. यासाठी काळजी घ्या.

ही खबरदारी घ्या
-गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
-हातांची सतत स्वच्छता करणे आवश्यक.
-मास्क घाला.
-वर्क फ्रॉम होम करणार्‍यांनी ओव्हरटाइम वर्क करू नये.
-सर्व डॉक्टरांनी 8 तासापेक्षा जास्त काम करू नये.
-व्हॅक्सीनचा डोस घेतल्यानंतर सुद्धा डॉक्टरांनी वेळेचे भान ठेवावे.
-डॉक्टर्स सतत काम करत असल्याने वेगाने संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
-60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी.