धक्कादायक खुलासा : यामुळेच झाली बोट दुर्घटना 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबई जवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाली. कार्यक्रमाला गालबोट लागलं. कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचा मोठा खुलासा झाला आहे. प्रत्यक्षात बोटीट क्षमता ही केवळ 16 प्रवाशांची होती. असे असताना देखील या बोटीत 25 जण बसवण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे 25 पेक्षा जास्त लोक बसवण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यामुळे बोट कललीही होती.
सदर प्रकार पाहून  तेथे उपस्थित असणाऱ्या पोलीसांनी या गोष्टीसाठी विरोध केला होता त्यानंतर जवळ जवळ 8 ते 10 जणांना  बोटीतून उतरविण्यात आले होते आणि बोटीतील लोकांची संख्या 25 झाली होती. यावरुन पोलीसांनी वाद केल्याचेही समजत आहे. जर पोलीसांनी जास्त लोक बसवण्यासाठी विरोध केला नसता तर बोटीतील लोकांची संख्या 35 झाली असती. नियोजनशून्यतेमुळे हा अपघात झाल्याची टीकाही शेकाप नेते जयंत पाटील यांनी केली होती.

वडगाव मावळमधील महिला (Lady Talathi) तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही ? 

शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणारी स्पीडबोटमध्ये सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नव्हती असेही समजत आहे. स्पीडबोटीत कोणतेही तटरक्षक दल सोबत नेले नव्हते. इतकेच नाही तर बोटीमध्ये नियमानुसार  24 लाईफ जॅकेट असायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात 6 ते 8  लाईफ जॅकेट बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली गेली नव्हती. दरम्यान लाईफ जॅकेट शिवाय बोटीत माणसे कसे बसवले गेले हा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त लोक यात का बसवले गेले हाही प्रश्न डोकावतो आहे.
नेमकी घटना काय होती ? 
दुपारी तीन वाजता गिरगाव चौपाटीजवळ अरबी समुद्रात  शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी तीन ते चार बोटी गेट वे ऑफ इंडिया वरून रवाना झाल्या होत्या. मात्र या कार्यक्रमाला जाणारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची स्पीडबोट  शिवस्मारकारकाजवळ आली असता खडकाला  धडकली आणि या बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. अपघातानंतर बोट समुद्रात बुडाली. त्यानंतर जवळपास सव्वा चार वाजता कोस्टगार्डला कॉल करण्यात आला . तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणारी टीम याठिकाणी पोहचली. या बोटीवर असलेले शिवसंग्रामचे 18 ते 20 कार्यकर्ते सुखरुप होते. अपघातानंतर पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला.  जी बोट उलटली त्यात मुख्य सचिव आणि भूषण गगराणी होते . त्यांना देखील सुखरूप स्थळी नेण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दहशत माजववण्यासाठी बाळगली पिस्तूल, पोलिसांनी केले गजाआड

तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर बचावासाठी घटनास्थळी दाखल झाली होती. अपघातावेळी स्पीड बोटमध्ये असलेल्या व्यक्तींना वेळीच बाहेर काढल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले होते. दुसरी बोट घटनास्थळी गेल्यानंतर बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली. तसंच दोन बोटींच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं. याशिवाय अग्निशमन दलाचे जवानही किनाऱ्यावर पोहचले होते.

जाहीरात