Symptoms of Coronavirus : जाणून घ्या, सर्वात अगोदर कोरोनाचे कोणते लक्षण दिसते, ‘हा’ 14 दिवसांचा क्रम जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने हाहाकार उडाला आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत अनेक स्टडीज झाले आहेत आणि त्यामध्ये याच्या लक्षणांबाबत अनेक महत्वाची माहितीसुद्धा समोर आहे. स्टडीमध्ये सांगण्यात आले आहे की, हा व्हायरस कशाप्रकारे शरीरावर हळुहळु हल्ला करतो. कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे होण्यास 14 दिवसांचा वेळ लागतो, ज्यास इनक्यूबेशन पीरियड सुद्धा म्हटले जाते.

पहिला दिवस –
कोरोनाने संक्रमित 88 टक्के लोकांना पहिल्या दिवशी ताप आणि थकवा जाणवतो. अनेक लोकांना पहिल्या दिवशीच मांसपेशींमध्ये वेदना आणि सुका खोकला होऊ लागतो. चीनच्या स्टडीनुसार, सुमारे 10 टक्के लोक तापातून लगेच बरे होतात परंतु नंतर डायरिया किंवा मळमळ सुद्धा जाणवते.

दुसरा दिवस ते चौथा दिवस –
ताप आणि कफ दुसर्‍या दिवसापासून लागोपाठ चौथ्या दिवसापर्यंत कायम राहतो.

पाचवा दिवस –
कोरोना व्हायरसच्या पाचव्या दिवशी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. हे विशेषकरून ज्येष्ठ किंवा अगोदरपासून इतर आजार असलेल्या लोकांमध्ये होते. मात्र, भारतात पसरलेल्या नव्या स्ट्रेनमध्ये कोरोनाच्या अनेक तरूण रूग्णांना सुद्धा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसत आहे.

सहावा दिवस –
सहाव्या दिवशी सुद्धा खोकला आणि ताप कायम राहतो. काही लोकांना या दिवसापासून छातीत दुखणे, दाब आणि ताण जाणवतो.

सातवा दिवस –
सातव्या दिवशी लोकांना छातीत तीव्र वेदना होतात आणि दाब वाढतो. श्वास घेण्यात अडचण येऊ लागते. ओठ आणि चेहरा निळा पडू लागतो. काही लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता भासते.

मात्र, ज्या लोकांमध्ये कोरोनाची हलकी आणि मध्यम लक्षणे आहेत ती सातव्या दिवसांपासून कमी होण्यास सुरूवात होते. हलक्या लक्षणाच्या रूग्णांना या दिवसापासून चांगले वाटण्यास सुरूवात होते.

आठवा-नववा दिवस –
चीनच्या सीडीसीनुसार, आठव्या-नवव्या दिवशी जवळपास 15 टक्के कोरोनाच्या रूग्णांना अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम जाणवतो. या स्थितीत फुफ्फुसांमध्ये फ्लूएड तयार होण्यास सुरूवात होते आणि फुफ्फुसांमध्ये योग्य प्रमाणात हवा पोहचत नाही. यामुळे रक्तातील ऑक्सीजन कमी होऊ लागतो.

दहावा-अकरावा दिवस –
श्वास घेण्याची समस्या वाढते आणि स्थिती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णाला आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करावे लागते. तर स्थिती चांगली झाल्यास रूग्णाला दहाव्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो.

बारावा दिवस –
वुहान स्टडीनुसार, बहुतांश लोकांना 12व्या दिवशी ताप येणे बंद होते. काही लोकांना तरीही कफची समस्या कायम राहते.

तेरावा-चौदावा दिवस –
या व्हायरसला सहन करणार्‍या काही लोकांमध्ये तेराव्या-चौदाव्या दिवशी श्वास घेण्याचा त्रास बंद होऊ लागतो.

अठरावा दिवस –
स्टडीनुसार लक्षणे दिसल्याच्या पहिल्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत रूग्ण संक्रमित होऊन बरा होतो, परंतु जर 18व्या दिवशी सुद्धा स्थिती गंभी राहीली तर ही चिंतेची बाब असू शकते.