‘अयोध्या’ बाबत येणार्‍या निर्णयामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेसोबत जाण्याबाबत ‘व्दिधा’ मनस्थितीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मुद्दावरुन बोलावलेल्या बैठकीत सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की लवकरच गोड बातमी कळेल. या बैठकीनंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि शिवसेनेच्या समसमान वाटपाचा मुद्द्यावर देखील चर्चा झाली. परंतू संजय राऊत यांनी ट्विट केले की ‘तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं कमाल है कि, फिर भी तुम्हें यकीन नहीं’.  राऊतांच्या या ट्विटचा संबंध भाजप नेत्यांच्या आजच्या राज्यपालांच्या भेटीशी जोडला जात आहे.

शिवसेनेचा हा प्रकार पाहून असे वाटते की शिवसेना भाजप शिवाय कोणत्याही पक्षाबरोबर मिळून सत्ता स्थापन करु शकतो. संजय राऊत यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. या दरम्यान शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची देखील भेट घेतली, त्यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला समर्थन देण्याच्या विचारात आहे.

परंतू शरद पवार यांनी स्पष्ट केले की त्यांना विरोधीपक्षात बसण्याचा जनादेश मिळाला आहे. परंतू काँग्रेसकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले की भाजप-शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करत नाही तर त्यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काही तरी निर्णय घेईल. परंतू यांनी हे सांगितले नाही की बहुमतासाठी ते कोणाचे समर्थन घेणार आणि शिवसेनेचे घेतले तर शिवसेना त्यासाठी तयार होईल का?

असे सांगितले जात आहे की शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी जास्त विचार करत आहे. याचे कारण आहे या महिन्यात अयोध्या मुद्यावर येणारा निर्णय. आणि त्यावर येणाऱ्या निर्णयावर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असू शकते याची चिंता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेने पहिल्यांदाच केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की मंदिर तयार करण्याचा मार्ग मोकळा करावा. जर काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार शिवसेनेबरोबर जाते तर अयोध्येवर शिवसेनेकडून येणाऱ्या प्रतिक्रियेवर या दोन्ही पक्षांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला धक्का लागू शकतो. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेसोबत जाण्याबाबत ‘व्दिधा’ मनस्थितीत असल्याचे समजते.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके