Covid-19 Second Wave : कशामुळं दुसऱ्या लाटेत ह्रदयविकाराच्या झटक्याने मरताहेत कोरोना Positive? जाणून घ्या त्याची लक्षणं आणि उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायसरचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृतांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. त्यावरून ऑक्सफोर्ड जर्नलकडून सुरु करण्यात आलेल्या एका अभ्यासात समजले, की दुसऱ्या लाटेत ह्रदयविकाराच्या झटक्याने हजारो कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोनातून बरे झालेल्या 50 टक्के रुग्णांच्या ह्रदयात महिनाभरात डॅमेज झाल्याचे पाहिला मिळाला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाचा हार्ट रेट तपासणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. कोविड-19 इन्फेक्शनला ट्रिगर करतो. त्यामुळे ह्रदयाची मांसपेशी कमजोर पडू लागते. ह्रदयाची गती प्रभावित होते. ब्लड क्लॉटिंगची समस्याही असामान्यपणे उत्पन्न होऊ लागते. व्हायरस थेट आपल्या रिसेप्टर सेल्सवर हल्ला करतो. ज्यामुळे ACE2 रिसेप्टर्सच्या रुपात ओळखला जातो. हा मायोकार्डियम टिशूच्या आत जाऊन नुकसान होऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले.

तसेच मायोकार्डाइटिस सारखी अडचणी हार्ट मसलचे इन्फ्लेमेशन आहे. जर देखभाल न केल्याने एका विशिष्ट कालावधीनंतर हार्ट फेल्यूअर होऊ शकते. हे पहिल्यापासून ह्रदयविकाराच्या समस्येचा सामना करणाऱ्यांच्या अडचणींत वाढ होऊ शकते.

केव्हा होते हार्ट फेल?

जेव्हा त्या व्यक्तीचे मांसपेशी रक्ताला कुशलतेसह पम्प करू शकत नाही. जितकी त्याला गरज असते. या कंडीशनमध्ये संकुचित धमन्या आणि उच्च रक्तदाब ह्रदयाला योग्य पम्पिंगसाठी कमकुवत बनवते. ही एक क्रॉनिक समस्या आहे. ज्याचा योग्यवेळी उपचार केला नाही तर समस्या आणखी बिघडू शकते. तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ह्रदयाचा त्रास होतो किंवा संक्रमित होण्यापूर्वी ज्या कोणाला किरकोळ ह्रदयविकार नव्हता त्यांना इमेजिंग करणे गरजेचे आहे. त्यातून रुग्णाच्या मांसपेशींना व्हायरसने किती नुकसान पोहोचवले आहे, हे समजू शकते.

काय आहेत याची लक्षणं?

हार्ट फेल होण्यापूर्वी रुग्णाला श्वसनात त्रास होऊ शकतो. याशिवाय थकवा, कमजोरी जाणवू शकतो. पंजा, टाचा आणि पायांची सूज वाढू लागते. हार्ट बीट वेगाने आणि अनियमित होऊ शकते. तुमची व्यायाम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. सातत्याने खोकला यांमुळे वजन वाढू शकते. भूक लागत नाही तर सारखी लघवी होते.

लक्षणे दिसल्यास…

जर कोणत्याही व्यक्तील अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरशी संपर्क साधावा. स्वत: उपचार करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टरच याबाबत अधिक सांगू शकतात. हार्ट फेलिअर म्हणून होत आहे की इतर कोणत्याही कारणाने हे सांगू शकतील.