नेपाळमध्ये पतंजलीच्या कोरोनिल किटच्या विक्री आणि वितरणावर का लावला गेला प्रतिबंध?

पाटणा : वृत्तसंस्था – नेपाळमध्ये पतंजलीच्या कोरोनिल किटवर (coronil kit) प्रतिबंध लावल्याचे वृत्त आल्यानंतर आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडून कोरोनिल किटच्या (coronil kit) विक्री आणि वितरणावर तोपर्यंत प्रतिबंध लावला गेला आहे जोपर्यंत ते नेपाळ सरकारच्या नियमानुसार विभागात रजिस्टर्ड होत नाही.

‘बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’ अमृता फडणवीसांचा शायरीतून शिवसेनेला टोला

पतंजली योगपीठ नेपाळने भारताकडून सुमारे 100 कार्टून कोरोनिल किट (coronil kit) मागवून कोरोनाला तोंड देत असलेल्या नेपाळला मदत देण्यासाठी सरकारला भेट म्हणून हे कोरोनिल किट दिले होते.
31 मे रोजी एका सोहळ्यात पतंजली योगपीठ नेपाळचे मुख्य ट्रस्टी शालिग्राम सिंह यांनी नेपाळचे तत्कालीन आरोग्य मंत्री हृदयेश त्रिपाठी यांना 1500 कोरोनिल किट भेट म्हणून प्रदान केले होते.

आरोग्य मंत्रालयाकडून हे किट आयुर्वेद विभागाला सोपवून नेपाळमध्ये सुरू असलेल्या आयुर्वेदिक आयसोलेसन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ते वापरण्यास सांगितले होते.
आयुर्वेद विभागाचे महासंचालक डॉ. वासुदेव उपाध्याय यांनी सांगितले की,
आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त कोरोनिल किटच्या वापरावर काही काळासाठी प्रतिबंध लावण्यात आला आहे.

डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, कोरोनिल किटवर अजूनपर्यंत नेपाळच्या औषध व्यवस्था विभागामध्ये संबंधीत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
ही प्रक्रिया पूर्ण होताच वापराची परवानगी दिली जाईल.

नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते कृष्ण पॉडेल यांनी सुद्धा यास दुजोरा दिला आहे की,
नेपाळ सरकारकडून अजूनपर्यंत कोरोनिल किटवर प्रतिबंधाबाबत कोणत्याही प्रकारचा आदेश जारी करण्यात आलेला नाही.
ते प्रक्रियामध्ये असल्याने काही काळासाठी याच्या वापरावर प्रतिबंध लावला आहे.

पतंजली योगपीठ नेपाळचे ट्रस्टी शालिग्राम सिंह यांनी म्हटले आहे की,
या प्रक्रियेसाठी काही वेळ लागणार असल्याने त्याचा वापर थांबला आहे.
महामारीच्या काळात सरकार किंवा आरोग्य विभागाने ही प्रक्रिया लवकर केली पाहिजे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत