Serum चे CEO अदार पुनावाला ब्रिटनला का गेले? धमक्यांमुळे की ‘सीरम’च्या लसींचा व्यवसाय वाढवण्यासाठी?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. बाधितांची संख्या पाहता केंद्र सरकारने लसीकरणाला सुरुवात केली आहे. सध्या भारतात कोरोना प्रतिबंध लसीचा तिसऱ्या टप्याला प्रारंभ झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीसाठी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि लस कंपन्यांमध्ये चर्चा रंगली आहे. तिसऱ्या लसीकरणाला प्रारंभ झाला असला तरी दुसऱ्या टप्यातील लोकांसाठी लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आता सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांना धमक्या मिळत असल्याने ते ‘परिवारासमवेत ब्रिटनला दाखल झाले. यामध्येच आता अदार पुनावाला ब्रिटनमध्ये लसींचा व्यवसाय प्रारंभ केल्याने अधिक चर्चा रंगली आहे.

कोरोना विषाणूला सरकारने हलक्यात घेतले आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचा गंभीर आरोप सीईओ पुनावाला यांनी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच ते म्हणाले होते की, यंदाच्या जानेवारी महिन्यात रुग्णाची संख्या कमी झाली होती, म्हणून सीरमला लसीच्या ऑर्डर मिळाल्या नाहीत. याचा परिणाम असा झाला की, सीरमने संस्थेने कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी अधिक क्षमता वाढविली नाही, असे पुनावाला यांनी म्हणाले होते. तसेच, माध्यमाच्या अहवालानुसार सरकारने पुरेशा प्रमाणात ऑर्डर दिली होती. दरम्यान, केंद्र सरकारने देखील सीईओ पुनावालांचे आरोप फेटाळून लावले असून कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याची ऑर्डर कंपनीला दिलेली आहे. परंतु, त्यानुसार कंपन्या लस पुरविण्यास असमर्थ ठरल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लसीची मागणी देखील कंपन्यांना पूर्ण करता आलेली नाही, असे सांगण्यात आले आहे.

सिरमचे सीईओ अदार पुनावाला ब्रिटनला का गेले?
कोरोना प्रतिबंधक लसीवरून सीरम इन्स्टिटयूट आणि केंद्र सरकार यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. आणि अशातच पुनावाला यांनी UK मध्ये बिझनेस प्रारंभ करण्यासाठी मन बनविले आहे. तर पुनावाला हे धमक्यांमुळे ब्रिटनला गेले असले तरी सुद्धा त्यामागचा त्यांचा योजना अनोखीच असल्यासाचे पुढं आले आहे. सीईओं पूनावालांना अनेक बड्या राजकारण्यांचे, उद्योगपतींचे धमकीचे फोन येऊ लागल्याचा असा दावा त्यांनी केलाय. म्हणून पुनावाला यांना केंद्र सरकारने केंद्र ‘Y’ दर्जाची सुरक्षा दिली होती. असे असले सुद्धा अदार पुनावाला यांनी आपल्या परिवारासोबत ब्रिटनला दाखल झाले आहेत. यामुळे आश्यर्याची चर्चा रंगत आहे.

दुसरं म्हणजे अदार पुनावाला यांनी मागील महिन्यात ब्रिटनमध्ये अधिक भाडे देऊन १ अलिशान महाल घेतला होता. म्हणून त्यांची UK मध्ये बिझनेस वृद्धी करण्याचे मनसुबे स्पष्टच समोर आली आहेत. तसेच, ब्रिटनच्या सरकारने UK India Trade Deal (करार) अंतर्गंत मोठी घोषणा केली आहे. एक अब्ज पाऊंडच्या या करारामुळे देशात ६ हजार ५०० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यांच्यानुसार सीरमने UK मध्ये लसीच्या बिझनेससाठी २४० दशलक्ष पाऊंडची इनव्हेसमेंट केलीत. म्हणून नवीन आहे. यानुसार नवीन विक्री कार्यालय उघडले जाणार आहे. म्हणून या सर्व गोष्टीवरून अदार पुनावाला खरच धमक्यांमुळे ब्रिटनला दाखल झाले का? वा आपला व्यवसाय वाढविण्यासाठी? असे सवाल उठले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने मागील महिन्यात १६ कोटी डोसची मागणी नोंदविली होती. हे लसीचे डोस येत्या ३ महिन्यांत दिले जाणार आहेत. २८ एप्रिलला सीरमला ११ कोटी आणि भारत बायोटेकला ५ कोटींची ऑर्डर दिली होती. तर पुण्यातील सीरम संस्थेला य़ाचे १७३२.५ कोटी रुपये आणि भारत बायोटेकला ७८७.५ रुपये देण्यात आले आहेत. यामुळे सीरमच्या अदार पुनावालांचा आरोप चुकीचा आहे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.