जास्त जागा जिंकूनही BJP ने नितीशकुमारांना CM का बनवल ? : वाचा इनसाईड स्टोरी

पटणा : पोलीसनामा ऑनलाईन – बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना दिले( why-did-bjp-make-nitish-kumar-chief-minister-even-after-winning-more-seats) गेले. भाजपाने हे करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांचे चांगले संबंध मानले जात आहेत. इतकेच नाही तर अलीकडेच दोन मोठ्या मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडल्याने जेडीयूला सोबत ठेवणे भाजपसाठी गरजेचे होते, असे बोलले जात आहे.

भाजपाने भलेही मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना दिले असले तरी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाचे प्रतिनिधित्व सर्वात जास्त राहणार आहे. मागील सरकारपेक्षा यंदाच्या सरकारमध्ये भाजपाचे मंत्री जास्त असतील. यात भाजपा मागासवर्गीय आणि दलित समुदायातील अनेक नेत्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे. भाजपाच्या या रणनीतीने आरजेडीला घेरण्याचा प्रयत्न आहे.

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. बिहारमध्ये बीएसपी म्हणजे वीज, रस्ते आणि पाणी असा प्रमुख फॅक्टर आहे. ज्यावर मागील काही काळापासून खास काम केले गेले आहे. नवीन आलेले सरकार आरोग्य, शिक्षा आणि सामाजिक विकास सुधारणेसाठी काम करणार आहे. बिहारमध्ये एनडीए स्थापन करण्यासाठी नितीश कुमारांचे योगदान मोठे आहे.

नव्या सरकारमध्ये ‘या’ विषयावर भाजपाचं लक्ष
एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचे भाजपाला ठाऊक आहे, अशा परिस्थितीत पक्ष हे लक्षात घेऊन पुढे जात आहे. केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेत, म्हणूनच त्यांनाही सरकारमध्ये नेण्यासाठी भाजपा पावले उचलणार आहे.

नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्याने नितीश कुमार यांच्याकडे सरकारचे नेतृत्त्व राहिले आहे. तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचे नेतृत्त्व करणे नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.