के.एल. राहुलला टीममधून का दाखवला बाहेरचा रस्ता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- दक्षिण आफ्रिकेविरोधात 2 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या 3 कसोटी सामन्याच्या सीरीजसाठी गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आपल्या खराब फॉर्मसोबत झगडत असलेल्या के एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता त्याचा जागी रोहित शर्मा टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसणार आहे. के एल राहुलच्या जागी तरूण फलंदाज शुभमन गिल याला कसोटी सामन्यात जागा देण्यात आली आहे.

पंजाबच्या या खेळाडूला जर अंतिम 11 मध्ये संधी मिळाली तर तो टीम इंडियासाठी 296 वा खेळाडू बनेल. लोकेश राहुल आपल्या 36 कसोटी सामन्यात आपल्या करिअरच्या 60 डावांमध्ये 2006 रन बनवले आहेत. राहुलच्या नावावर 5 शतक आणि 11 अर्धशतक आहे. परंतु त्याचं सध्याचं सादरीकरण खूप खराब होतं. मागील 12 डावांमध्ये तो 50 आकडाही पार करु शकला नाही.

आपल्या 27 कसोटी सामन्यात रोहित शर्माने 39.62 च्या सरासरीने 1585 रन बनवले. यात त्याचे 3 शतक आणि 10 अर्धशतक आहेत. त्याने कोलकात्यातील आपल्या डेब्यू कसोटी साम्यात 177 रन बनवत आपल्या कसोटी सामन्यातील करिअरला सुरुवात केली होती. यानंतर मुंबईत वेस्ट इंडिज विरुद्ध 111 रन बनवले.

हनुमा विहारी आणि अजिंक्य रहाणेने 5 वा 6 क्रमांक निश्चित केला आहे. रोहित शर्माला ओपनिंग बॅट्समन म्हणून आजमावलं जाऊ शकतं. विश्वचषकात 5 शतक मारणाऱ्या रोहित शर्माला वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या दोन्हीही कसोटी सामन्यात अंतिम 11 मध्य संधी मिळाली नव्हती. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आणि कॅप्टन विराट कोहली चौथ्या नंबरवर फिक्स आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –