25 वर्षे युतीत असूनही ‘त्यांना’ विसर कसा ! ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांबद्दल एक ट्विटही करता आले नाही ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतिदिनी (Balasaheb Thackeray death anniversary) काँग्रेसच्या नेत्यांनी साधे ट्विटही केले नाही, असा टोला भाजप नेते नीतेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांनी कॉंग्रेसला लगावला होता. मात्र, या ट्विटला आता महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र देहाडे (Jitendra Dehade ) यांनी पुराव्यासहीत उत्तर दिले आहे. त्यानंतर नीतेश यांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधींच्या ट्विटची मागणी केल्यानंतर काँग्रेसने भाजप शिवसेना एवढ्या वर्षांपासून युतीत होते तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी साधं एक ट्विटही करता ( why-did-not-narendra-modi-and-amit-shah-tweeted-on-balasaheb-death-anniversary) आले नाही का ? असा प्रश्न नीतेश यांना विचारला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता, तर अनेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, नीतेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करणारे एक ट्विट केले आहे. संपूर्ण दिवस संपला. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसश्रेष्ठींकडून एकही संदेश किंवा ट्विट करण्यात आले नाही. जर बाळासाहेब ठाकरे यांचीच दखल घेतली जात नसेल, तर शिवसेनेकडे उरलच काय ? असा सवालही नीतेश राणे यांनी केला. याच ट्विटला उत्तर देताना देहाडे यांनी काँग्रेसच्या सहा नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारे केलेल्या ट्विटसचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले.नीतेशजी तुमच्या माहितीसाठी, अशा कॅप्शनसहीत हे स्क्रीनशॉर्ट जितेंद्र यांनी शेअर केले आहेत.

यावर नीतेश यांनी जितेंद्र यांचे आभार मानले. त्याचबरोबर मला राहुलजी किंवा प्रियंकाजी यांचेही एखादे ट्विट फॉरवर्ड करा. कारण इंदिराजी आणि राजीवजींच्या स्मृतिदिनी उद्धवजींनी पोस्ट केलेले फोटो आपल्याकडे आहेत, असेही ते म्हणाले. यावर उत्तर देताना जितेंद्र यांनी, भाजप आणि शिवसेना बराच काळ युतीत होते. मग तुम्हीच मला का सांगत नाही की, नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजींनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त एखादं ट्विट का केलं नाही?,असा प्रश्न विचारला आहे. तसेच जितेंद्र यांनी व्यक्ती किंवा ती भूषवत असलेल्या पदाचा मान म्हणून तरी ट्विट करायला हवे होते, असेही म्हटले आहे.

नीलेश राणेंकडूनही ट्विट

मंगळवारी नीतेश राणे यांचे धाकटे बंधू नीलेश राणे यांनीही ट्विटवरून बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला टोला लगावला. बाळासाहेब आज तुम्ही नाहीत. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरलेले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झाले नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन,” असे म्हणत नाव न घेता नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.