इराणमध्ये आपल्याच सरकारविरूध्द रस्त्यावर का उतरले लोक ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याच सेनेच्या मिसाईल्सने युक्रेनचे प्रवासी विमान पाडल्यानंतर इराणच्या सरकारला आता दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरील प्रदर्शनाचा सामना करावा लागत आहे. हे प्रवासी 8 जानेवारी रोजी तेहरानमधून युक्रेनची राजधानी कीएफला जात होतं. तेहरानमधून उड्डाण केल्यानंतर इराणच्या सेनेने चुकून हे विमान पाडलं होतं. यात 176 लोक होते. यात 86 नागरिक हे इराणचे होते. विमानावर मिसाईल हल्ला झाल्यानंतर सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला.

विमान पाडल्याचं वृत्त इराणने फेटाळलं होतं. परंतु आंतरराष्ट्रीय गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनतंर इराणला हे मान्य करावं लागलं. यानंतर इराणमधील लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. तेहारानव्यतिरीक्त इतर अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चमकम झाल्याचेही समजत आहे.

याच महिन्यात 2 जानेवारी रोजी इराणी सैन्य कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ठार केलं होतं. याचाच पलटवार म्हणून इराणने इराकमध्ये 8 जानेवारी अमेरिकन सैन्याच्या तळांवर मिसाईल्सने हल्ला केला होता. यानंतर इराणी सेनेने युक्रेन प्रवाशांचं विमान पाडलं होतं. या प्लेनमध्ये इराणव्यतिरीक्त कॅनडा, युक्रेन, युके, अफगाणिस्तान आणि स्वीडनचे नागरिक होते.

रविवारी केलेल्या निषेधात काय झाले ?

सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात तैनात असतानाही आंदोलक रस्त्यावर उतरले होते. आंदोलन थांबवण्यासाठी दंगाविरोधी पोलीस, इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड सहित सिव्हील ड्रेसमध्ये अनेक सुरक्षारक्षक होते. तेहरानमधील शाहिद बेहिश्ती युनिव्हर्सिटीच्या ग्राऊंडवर इज्राइल आणि अमेरिकन राष्ट्रध्वज पेंट करण्यात आले होते. सर्व आंदोलक झेंड्यापासून गेले. सर्वजण झेंड्यावर जाण्यापासून बचावत होते.

सोशल मीडियावर अनेक ठिकाणी आंदोलकांनी इराण सरकारविरोधात घोषणा दिल्या होत्या. हे खोटं सांगत आहेत की, आपला दुश्मन अमेरिका नाही तर आपला दुश्मन देशातच आहे अशा अनेक घोषणा होताना दिसल्या.

एका रिपोर्टनुसार तेहरानच्या अनेक भागात एक हजाराहून अधिक लोक रस्त्यावर उतरले होते. तेहरानव्यतिरीक्त अनेक शहरात आंदोलने होताना दिसले. इराणमध्ये अनेक आंदोलक विद्यार्थी शनिवारी विद्यापीठाबाहेर एकत्र जमले होते. सुरुवातीला त्यांनी विमानात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्यांचा रागही दिसून आला. यानंतर पोलिसांनी अश्रू गॅसचा वापर केला आणि आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी इराणच्या सेनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. हे कृत्य लज्जास्पद अक्षम्य आहे असंही काहींनी म्हटलं

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/