‘वजनदार’ मधील ‘गोलू- पोलू ‘ गाण्याच्या शूटिंगदरम्यान अचानक घाबरून का पळाली प्रिया बापट?

पाचगणी : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. प्रियाने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. बऱ्याचदा या माध्यमावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिचा एक मजेशीर व्हिडीओ झी स्टुडिओने इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

झी स्टुडिओच्या इंस्टाग्राम पेजवर प्रिया बापटचा वजनदार चित्रपटातील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, की पाचगणीत एका हॉटेलमध्ये ‘वजनदार’ चित्रपटातील ‘गोलू-पोलू’ गाण्याचं चित्रीकरण सुरु होतं आणि अचानक प्रिया घाबरून पळाली… का, जाणून घ्यायचंय? याचं उत्तर दडलंय या व्हिडिओत. या व्हिडीओत पहायला मिळते आहे की, पाचगणीत वजनदार चित्रपटातील गोलू पोलू या गाण्याचे शूटिंग सुरू होते आणि प्रिया बापट गाण्यावर थिरकताना दिसत होती. अचानक शूट करत असताना अचानक समोरून माकडे येताना पाहून प्रिया बापट घाबरली आणि शूट सोडून पळून गेली. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

 

https://www.instagram.com/priyabapat/?utm_source=ig_embed

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती. काही दिवसांपूर्वी प्रिया बापट आणि उमेश कामत यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आता त्या दोघांची तब्येत हळूहळू सुधारते आहे. याबद्दल त्यांनीच सोशल मीडियावर सांगितले.