राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजप कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

नांदेड : पोलिसानामा ऑनलाईन – लोकसभेंच्या पार्श्वभूमिवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहेत, तसंच नेत्याची एकमेकांवर चिखल फेकही सुरु आहे. काल नांदेडमधील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यासाठी राहुल गांधींची सभा झाली. या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा टीका केली. ‘सर्व चोरांचे नाव हे मोदीच कसे काय असू शकते ?’, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला. त्यावरून मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आय़ोगाकडे धाव घेतली आहे.

सर्व चोरांचे नाव हे मोदीच कसे काय असू शकते ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित करत मोदींवर टीका केली. पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून देश सोडून पळून गेलेला भामटा नीरव मोदी आणि आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी यांची नावं घेऊन राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राहुल गांधी लोकांचा जातीवरुन अपमान करत असल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी राफेलवरून नरेंद्र मोदींना लक्ष्य करत मॅन्यूफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना अनिल अंबानीला ऑफसेटचा ठेका (कंत्राट) कसा मिळाला ? असा सवाल उपस्थित केला. नरेंद्र मोदींनी ऑफसेटचे कंत्राट अनिल अंबानीला देऊन नागरिकांचे ३० हजार कोटी रुपये अंबानीच्या खिशात टाकले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.