दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर असू शकतात ‘ही’ 5 कारणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकदा बाळ दूध पिऊन झाल्यानंतर ते उलटी करते. यामुळे पालकांनी घाबरणे सहाजिकच आहे. परंतु, घाबरण्यापेक्षा यामागील कारणे जाणून घेतली, आणि अशी समस्या होत असल्यास कोणत्या गोष्टींचे पालन करावे हे माहिती असेल तर ही समस्या टाळता येऊ शकते. समस्या जास्तच असेल तर डॉक्टरांना आवश्य सांगा.

दूध पिल्यावर बाळ उलटी का करते –

1  काही मुलांमध्ये जेनेटिक कारणामुळे उलटीची सवय असते. थोडक्यात जर आईवडीलांना अपचन अथवा पोटाच्या समस्या असतील तर लहान बाळामध्येही त्या असू शकतात

2  काही मुलांना दूध पिणं आवडत नाही त्यामुळे ते सुरूवातीचे काही दिवस दूध पिल्यावर उलटी करतात

3  पोटाच्या काही समस्यांमुळे बाळ दूध पिल्यावर उलटी करू शकतं. हे खूप गंभीर असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

4  पोट भरल्यामुळे जास्तीचं दूध बाळ तोंडावाटे बाहेर फेकून देते

5  बाळाला आडवं होऊन दूध पाजत असल्यामुळे दूध त्याच्या अन्ननलिकेत अडकून राहतं आणि थोड्यावेळाने बाहेर फेकलं जातं

बाळाने दूध पिल्यावर उलटी करू नये यासाठी टिप्स –

1  स्तनपान अथवा दूध पाजल्यावर मुलांना लगेच आडवं झोपवू नका

2  दूध पाजल्यावर तान्ह्या बाळाला आईने खांद्यावर झोपवून त्याला उभं धारावं ज्यामुळे दूध बाळाच्या पोटात जातं

3  बाळाची दूध पाजण्याची वेळ पाळा, वेगवेळ्या वेळेला बाळाला दूध पाजू नका

4  बाळाला पोट भरल्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अंदाजानुसारच त्याला स्तनपान द्या

5  आई जो आहार घेते त्याचा परिणाम दुधावाटे बाळाच्या आहारावर होत असतो, यासाठीच बाळाला पचेल असेच पदार्थ आईने स्तनपानाच्या काळात खावे